Tuesday, May 6, 2025

ताज्या घडामोडीठाणे

जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या

जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक पोलीस हवालदार वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा या रेल्वे मार्गिकेदरम्यान रेल्वे गाडीखाली येऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. ते सध्या मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते.


जितेंद्र आव्हाड हे मंत्री असताना ते अंगरक्षक होते. त्यावेळी अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी कदम यांना ठाणे पोलिसांनी अटकही केली होती. वैभव कदम यांनी आत्महत्या केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.


वैभव कदम हे बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास निळजे ते तळोजा या रेल्वे मार्गिकेवर आले. त्यावेळी त्यांनी रेल्वेगाडीखाली येऊन आत्महत्या केली. वैभव यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही.


त्यांच्या आत्महत्येची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आव्हाड हे मंत्री असताना त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अनंत करमुसे यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या मारहाणीप्रकरणात कदम यांना अटक झाली होती. त्यानंतर ते जामीनावर सुटले होते.

Comments
Add Comment