Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीदेश तुमच्या बापाचा माल आहे का? माजी खासदार निलेश राणे यांचा ठाकरे...

देश तुमच्या बापाचा माल आहे का? माजी खासदार निलेश राणे यांचा ठाकरे गटासह काँग्रेसवर चौफेर हल्लाबोल

सुषमा अंधारेंनी मर्यादा पाळल्या पाहिजेत आणि संजय राऊत तर रिकाम टेकडा माणूस

बीड : राजकारणात आजकाल कोणीही उठतो आणि बेताल भाषा वापरतात त्यावर मर्यादा आल्या पाहिजे. कोणताही माहिती नसताना काँग्रेस नेते राहुल गांधी हे वीर सावरकरांचा अपमान करतात. त्याबद्दल न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आणि खासदारकीही रद्द झाली. इकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ज्या तऱ्हेने बोलतात, जसे की त्या दोन-तीन टर्म निवडणुका लढल्या आहेत. कधी मंत्री होत्या का? त्यामुळे नेमका हा कॉन्फिडन्स त्यांच्यात कुठून आला? हेच कळत नसल्याचे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी म्हटले आहे.

२०२० मधील प्रकरणाच्या सुनावणीसाठी राणे आज केज न्यायालयात हजर झाले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना निलेश राणे म्हणाले की, अंधारे एकदाही निवडणूक लढल्या नाहीत. माझ्यापेक्षा त्या तीन वर्षांनी लहान आहेत. अंधारेताई जी भाषा वापरतात त्यावर मर्यादा आली पाहिजे. मर्यादा देखील पाळल्या पाहिजे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर बोलता, कोणत्या अधिकाराने तुम्ही बोलता, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

संजय राऊत तर रिकाम टेकडा माणूस

दरम्यान संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. संजय राऊत रिकाम टेकडे आहेत. त्यांना दुसरे काहीच काम नाही. महाराष्ट्रात त्यांची किंमत काय? पत्रा चाळचा तो आरोपी आहे. संजय राऊत याचा काय संबंध, असे म्हणत निलेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

देश तुमच्या बापाचा माल आहे का?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना मिळालेला सरकारी बंगला खाली करण्याची सूचना दिली. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. याबाबत ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत निलेश राणे यांनी टीका केली आहे.

निलेश राणे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “२००९ ला मी खासदार झालो तेव्हा राहुल गांधी दुसऱ्यांदा खासदार झाले पण त्यांना मंत्री कॅटेगिरीचा बंगला मिळाला. AICC व IYC ऑफिस शासकीय बंगल्यात आहेत. सोनिया गांधी ज्या घरात राहतात ते घर भारताच्या पंतप्रधानांकडे असलं पाहिजे पण त्या आजही तिथे राहतात”, अशा शब्दांत टीका केली आहे. तसेच, देश तुमच्या बापाचा माल आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -