अमेरिकेत प्रथमच विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची स्थापना

  1455

शिकागोच्या कालीबारी मंदिरात भक्तांची मांदियाळी


मुंबई (वार्ताहर) : अमेरिकेतील शिकागोच्या उपनगरात प्रथमच विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची स्थापना नुकतीच करण्यात आली. भक्तीभावाने पार पडलेल्या या सोहळ्यात शिकागो परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिकागोच्या कालीबारी मंदिरात महाराष्ट्राचे आद्य दैवत, वारकरी संप्रदायाचे कुलदैवत आणि अवघ्या विश्वाची माउली असलेल्या विठू माउलीची पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली.


या कार्यक्रमाचे आयोजन अवधूत दाते, सुजित कुलकर्णी, प्रसाद आधणीकर, माधव गोगावले, उर्मिला दामले, संजीव कुलकर्णी, राहुल सराफ, रवी पोळ आणि कालीबारी मंदिरातील स्वयंसेवक महाराष्ट्र मंडळातील अनेक भक्तगण व गीताराम दांगट यांनी केले होते. विठ्ठल रखुमाईची मोहक मूर्ती खास पंढरपूर येथून मागवलेली आहे. विठ्ठलाची मूर्ती ३२ किलो व रखुमाईची २९ किलो वजनाची असून या दोन्ही मूर्ती तीन फूट उंचीच्या आहेत व खास काळ्या पाषाणातून घडवलेल्या आहेत. 'तुळसी हार गळा, कांसे पितांबर आणि श्रवणी तळपती मकरकुंडले असे वर्णन असलेल्या या सावळया सुंदर मनोहर रूपाच्या दर्शनासाठी आसावलेल्या शिकागोतील भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.


मूर्ती स्थापनेनंतर माउली झांज पथकाचा कार्यक्रम, भजन, कीर्तन, विठ्ठलाची वारी, दिंडी, आरती आणि महाप्रसाद अशा दिवसभर चाललेल्या ह्या सोहळ्यात भक्तगण रमून गेले. शिकागोचे हवामान खूप बेभरवशाचे असते. सकाळी हिमवर्षाव होत होता, नंतर पाऊस आणि तापमान तर शून्य डिग्री सेल्सिअसच्या जवळपास होते. दाट ढगांनी आकाश भरून गेले होते. हवामान शास्त्रज्ञांनी दिवसभर हिमवर्षाव होईल आणि ढगाळ वातावरण राहील असे वर्तविले होते. अशा हवामानात बाहेर दिंडी वारी काढणे कठीण वाटत होते. मूर्ती स्थापना, भजन संपल्यावर माउली झांज पथक सुरू असताना लख्ख प्रकाश आणि पडलेल्या उन्हाने सर्वांनाच उभारी आली. संध्याकाळच्या उन्हात दिंडी व पालखी सुरू झाली. एरवी अशा वातावरणात जाड लोकरीचे पायमोजे, हिवाळी बूट आणि हिवाळी कोट घालूनच बाहेर पडणारे शिकागोचे रहिवासी पांडुरंगभक्त पायताण घातल्याविना विठ्ठलाच्या वारीत देहभान विसरून सामिल झाले.


यामध्ये ३ वर्षांच्या बालकापासून ९० वर्षांच्या वयोवृद्धांचा समावेश होता. वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात पुढे पुढे सरकत होते. काही तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन, तर काही टाळ, चिपळ्या, झांज यांच्या तालावर झेंडे उंचावत, लेझीम आणि फुगड्या खेळण्यात दंग होत होते.
आपल्या नवीन पिढीला महाराष्ट्राची संस्कृती कळावी व विठुरायाची भक्ती अनुभवता यावी यासाठी बालगोपाळांसाठीही एक छोट्या आकाराची पालखी सजवली होती. ते चिमुकले भोई भक्तगण पालखी आपल्या खांद्यावर घेऊन चालले. दिंडी संपल्यानंतर विठ्ठलाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments
Add Comment

आयएनएस तमाल भारतीय नौदलात

मॉस्को : आयएनएस तमाल ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. रडारपासून स्वतःचे अस्तित्व लपविणारी ही

Asim Munir: पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर पुन्हा बरळला!

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देण्याच्या केल्या वल्गना इस्लामाबाद : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर

३५ हजारांचं कर्ज फेडलं नाही म्हणून हिंदू महिलेवर बलात्कार आणि मारहाण, आरोपीला अटक

ढाका : ३५ हजारांचं कर्ज असल्याने हिंदू महिलेला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची गंभीर घटना

अल्लाहच्या शत्रूंना नेस्तनाबूत करू, ट्रम्प-नेतन्याहू यांच्याविरोधात इराणच्या शिया धर्मगुरूंचा फतवा

नवी दिल्ली: इराणचे शीर्ष शिया धर्मगुरूंनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायचे पंतप्रधान

रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला, एफ-१६ लढाऊ विमानाचा पायलट ठार

क्वीव: युक्रेनच्या हवाई हद्दीवर रशियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. युक्रेनचे अध्यक्ष

पाकिस्तान : आत्मघातकी स्फोटात १६ सैनिकांचा मृत्यू

उत्तर वझिरिस्तान : पाकिस्तानमधील उत्तर वझिरिस्तानमध्ये स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सैनिकांच्या वाहनाला धडक