Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

बड्या आयपीएस अधिकाऱ्याच्याच नावाने देशातील आयपीएस अधिकाऱ्यांना गंडा

बड्या आयपीएस अधिकाऱ्याच्याच नावाने देशातील आयपीएस अधिकाऱ्यांना गंडा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या बनावट ट्वीटर अकाऊंटवरुन देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांनाच गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, भामट्याने आयपीएस मोक्षदा पाटील यांच्या नावाने बनावट ट्विटरवर अकाऊंट बनवले. त्यानंतर या बनावट खात्यावरून त्याने एक पैशांची मदत मागणारी पोस्ट टाकली. एका मुलीला लिव्हर ट्रान्सप्लांटवरील उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे, असा बनाव रचला. उपचार सुरू असलेल्या मुलीसह एका महिलेचा फोटो आणि क्यूआर कोड ट्विट करून व्हायरल केला. तर हे अकाऊंट मोक्षदा पाटील यांचे असल्याचा विश्वासाने देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांनी पैसे पाठवून मदत केली आहे.


दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच मोक्षदा पाटील यांनी याबाबत सायबर पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर अनेकांकडून रिपोर्ट गेल्यानंतर २७ मार्चला रात्री ११ वाजता हे खाते बंद करण्यात आले. अनेक मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी मोक्षदा पाटील यांचे खाते असल्याच्या विश्वासाने पैसे पाठवले होते.

Comments
Add Comment