Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेसुट्टीच्या दिवशी महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

सुट्टीच्या दिवशी महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

ठाणे (प्रतिनिधी) : राज्यातील वीजग्राहकांची थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे, वीज बिल वसुली करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून, ग्राहकांना वीजबिल भरण्याच्या सोयीसाठी तसेच वीजबिल वसुलीला चालना देण्यासाठी सुट्टीच्या दिवशी गुरुवार रामनवमी, शनिवार व रविवारी भांडूप परिमंडलातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहतील.

सध्या, भांडूप परिमंडलात वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरु आहे. याशिवाय, तात्पुरता व कायमस्वरूपी खंडित केलेल्या वीज जोडणीची तपासणी केली जात आहे. यामध्ये अनधिकृतपणे वीज वापरत असलेल्या ग्राहकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी अधिकृतपणे वीजेचा वापर करावा व आपले वीजबिल नियमितपणे भरावे, असे आवाहन भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी ग्राहकांना केले आहे. तसेच, ग्राहकांच्या सोयीसाठी भांडूप परिमंडलातील सर्व वीजबिल भरणा केंद्र गुरुवारी राम नवमीच्या दिवशी तसेच शनिवारी व रविवारी या सुट्टीच्या दिवशी सुरु राहतील. वीज ग्राहक महावितरणच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in अथवा महावितरणच्या मोबाईल ॲप अशा ऑनलाईन माध्यमातूनही घरबसल्या वीजबिल भरू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -