Sunday, August 31, 2025

छगन भुजबळ, शंभूराज देसाई कोरोनाग्रस्त

छगन भुजबळ, शंभूराज देसाई कोरोनाग्रस्त

नाशिक (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ तसेच राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुजबळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. राज्यभरात पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. दरम्यान भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे.

तर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना कोविड चाचणीचा सल्ला दिला आहे.

शंभूराज देसाई यांनी ट्विट करत सांगितले की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी निवासस्थानी गृहविलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असं मी आवाहन करतो.

नुकतेच विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. यावेळी हे सर्वच नेते सभागृहात उपस्थित होते. त्यामुळे आमदारांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment