Wednesday, May 14, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

अनिक्षा जयसिंघानी गायब?

अनिक्षा जयसिंघानी गायब?
मुंबई: अमृता फडणवीस धमकी प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानी जामीन मिळाल्यानंतर गायब झाली आहे. भायखळा कारागृहातून सुटका झाल्यानंतर ज्या घरातून अनिक्षाला अटक करण्यात आली होती, तिथे ती परतेल, अशी शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात अनिक्षा उल्हासनगरच्या तिच्या घरी परतलेलीच नाही.

उल्हासनगरच्या कॅम्प १ भागातील मायापुरी अपार्टमेंटमध्ये ८०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अनिक्षा राहत होती. मात्र या फ्लॅटला अजूनही कुलूपच आहे. त्यामुळे चौकशी आणि माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी अनिक्षा अज्ञातस्थळी रवाना झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी अनिक्ष जयसिंघानीचे वडील बुकी अनिल जयसिंघानी तसंच नातेवाईक निर्मल जयसिंघानी या दोघांना गुजरातमधून २० मार्च रोजी अटक केली होती. ते पोलीस कोठडीत आहेत. या दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटळला आहे.
Comments
Add Comment