Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

भारतात आलेल्या मादी चित्त्याने दिला गोंडस बछड्यांना जन्म, पाहा व्हिडिओ

भारतात आलेल्या मादी चित्त्याने दिला गोंडस बछड्यांना जन्म, पाहा व्हिडिओ

शेओपूर (वृत्तसंस्था): नामिबियातून भारतात आणलेल्या मादी चित्त्याने दोन दिवसांपूर्वी ४ बछड्यांना जन्म दिला आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या पथकानेही आवारात जाऊन याची पुष्टी केली. या बछडयांना जन्म देणारी चित्ता मादी सिया बडा नंबर ४ मध्ये आहे.


गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नामिबियातून ८ चित्ते भारतात आणण्यात आले होते. १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्तांना आण्यात आले होते. यामध्ये एका मादी चितेचा सोमवारी मृत्यू झाला. ती किडनीच्या आजाराने त्रस्त होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला भारतात आणण्याअगोदरच ही समस्या होती.





जानेवारीमध्ये तिला हा आजार झाल्याचे निदान झाल्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तिच्यावर उपचार करत होते, मात्र तिला वाचवता आले नाही. तेव्हापासून भारत सरकारच्या प्रोजेक्ट चित्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. दरम्यान, ४ बछड्यांच्या जन्मामुळे या प्रकल्पावरीव विराम मिळण्याची शक्यता आहे. बछड्यांच्या जन्मावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment