आधार-पॅन लिंक करण्याची मुदत पुन्हा वाढवली!

  695

सरकारने आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत पाचव्यांदा वाढवली, ३० जूनपर्यंत दिला वेळ


नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स म्हणजेच CBDT ने पॅन (PAN) नंबरला 'आधार'शी लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. आता ही मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.


करदात्यांना आधार कार्ड पॅनशी लिंक करण्यासाठी आणखी थोडा कालावधी देण्यात आला आहे. आतापर्यंत ज्यांनी पॅनला आधारशी लिंक केलेले नाही ते ३० जूनपर्यंत लिंक करू शकतात. CBDT ने PAN ला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत पाचव्यांदा वाढवली आहे.


आयकर कायदा १९६१ च्या कलम 139AA नुसार, ज्यांच्याकडे आधार कार्ड आणि पॅन दोन्ही आहेत त्यांना ही दोन कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. आता त्याची अंतिम तारीख ३० जून करण्यात आली आहे. CBDT नुसार, शेवटची तारीख संपल्यानंतर तुमचे पॅन कार्ड काम करणार नाही आणि तुम्ही वित्त संबंधित कोणतेही काम करू शकणार नाही. बँक खात्याशी संबंधित व्यवहारही करता येणार नाहीत. अशा परिस्थितीत, या मुदतवाढीमुळे अशा लोकांना दिलासा मिळणार आहे, ज्यांनी अजूनही पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही.



पॅन-आधार लिंक स्टेटस ऑनलाइन कसे तपासून पाहाल?


आयकर ई-फायलिंग पोर्टलवर जा.


होमपेजवरील 'क्विक लिंक्स' पर्यायावर क्लिक करा. यानंतर, 'आधार स्टेटस' निवडा.


तुम्हाला पॅन आणि आधार क्रमांक टाकण्यासाठी दोन रिकाम्या जागा दिसतील.


पॅन आणि आधार क्रमांक नमूद करा.


त्यानंतर, सर्व्हर पॅन-आधार लिंक स्थिती तपासतो आणि एक पॉप-अप संदेश देतो.


जर दोन्ही कार्ड लिंक झालेले असतील तर, "तुमचा पॅन आधीच दिलेल्या आधारशी लिंक केलेला आहे" असा संदेश येईल.


तुमचे पॅन आणि आधार कार्ड लिंक केलेले नसल्यास, पॅन आधारशी लिंक नाही असा संदेश दिसेल. तुमचा आधार पॅनशी लिंक करण्यासाठी कृपया 'Link Aadhaar' वर क्लिक करा.


लिंक प्रक्रियेत असल्यास, करदात्याला त्याच्या विंडोवर दिसेल की, तुमची आधार-पॅन लिंकिंग रिक्वेस्ट व्हेरिफिकेशनसाठी UIDAI कडे पाठवली गेली आहे. कृपया मुख्यपृष्ठावरील 'लिंक आधार स्टेटस' या लिंकवर क्लिक करून स्टेटस तपासा.

Comments
Add Comment

फवाद खान, माहिरा आणि शाहीद आफ्रिदी...पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या अकाऊंट्सवर २४ तासांत पुन्हा बंदी

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान

जीएसटीच्या १२ टक्के स्लॅबमध्ये बदलाची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मुलाखतीत दिले संकेत

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १२ टक्के जीएसटी स्लॅबमधील वस्तूंचा ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समावेश करण्याची तयारी

पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत, या दरम्यान ते ब्रिक्स शिखर

नॅशनल हेरॉल्ड : ५० लाखात बळकावली २ हजार कोटींची मालमत्ता, राहुल आणि सोनिया गांधींसंदर्भात ईडीचा कोर्टात दावा

नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधींनी ५० लाखात २ हजार कोटींची मालमत्ता

केंद्रीय कृषीमंत्री २ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३ आणि ४ जुलै रोजी

खासगी दुचाकींना बाईक टॅक्सी सेवा देण्यास केंद्र सरकारची परवानगी

नवी दिल्ली : देशात प्रथमच केंद्र सरकारने खासगी वापरासाठी नोंदणीकृत दुचाकींना राईड-हेलिंग अ‍ॅग्रीगेटर