Sunday, July 21, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणरत्नागिरीत आढळला ‘रामगड’ किल्ला

रत्नागिरीत आढळला ‘रामगड’ किल्ला

समुद्रसपाटीपासून ३९० मीटर उंचीवर लहान किल्ला

मुंबई (वृत्तसंस्था): कोकणात म्हणजेच, रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली आणि खेड तालुक्याच्या सीमेवर रामगड नावाचा किल्ला आढळल्याची माहिती पुढे आली आहे. दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातील अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनी याबाबतची माहिती उजेडात आणली. जोशी आणि परांजपे यांनी इतिहासातील संदर्भ आणि वास्तू रचनेतील शास्त्रीय पुराव्यांवर आधारित असा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. याच ठिकाणी असलेल्या पालगडच्या पूर्वेला समुद्रसपाटीपासून अंदाजे ३९० मीटर उंचीवर हा लहान किल्ला आहे. याच ठिकाणी असलेल्या पालगडसाठी हा जोडकिल्ला असावा, असा अंदाज देखील अभ्यासकांनी वर्तवला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधीच ‘रामगड’ नावाचा किल्ला आहे. आता दापोली तालुक्यात याच ‘रामगड’ नावाचा किल्ला आढळल्याचा दुर्ग अभ्यासकांचा दावा आहे. दापोली तालुक्यातील दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सिमेवर रामगड नावाच्या किल्ल्याचा शोध दुर्ग अभ्यासकांनी शोधला आहे. दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि डेक्कन कॉलेजचे पुरात्व अभ्यासक सचिन जोशी यांनी रामगड किल्ल्याचा शोध लावला आहे. या नव्याने आढळलेल्या ‘रामगड’ किल्ल्याला ऐतिहासिक संदर्भ आहे. तसेच वास्तुरचनेतील शास्त्रीय पुराव्यांवर आधारित ‘रामगड’ हा अपरिचित दुर्ग असल्याचेही या दुर्ग अभ्यासकांचे म्हणणे आहे.

सॅटेलाईट फोटोत दिसले अवशेष…

दापोलीतील रामगड किल्ल्याचे सॅटेलाइट फोटोही काढण्यात आले आहेत. या सॅटेलाईट फोटोंमधून किल्ल्याच्या काही बांधकामांचे अवशेष आढळले आहेत. किल्ल्याच्या सर्वेक्षणात रामगड किल्ल्याचा दरवाजा, त्याचे दोन संरक्षक बुरुज, तटबंदीतील चार बुरुजांसह इमारतींचे अवशेष, काही थडगी, भांड्यांचे तुकडे सापडले आहेत. किल्ल्याची तटबंदी आणि दरवाजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असल्याचे दुर्ग अभ्यासकांनी सांगितले.

इतिहासातील आणखी पाने उलगडणार…

रामगड किल्ल्याच्या शोधामुळे इतिहासातील आणखी पाने उलगडली जाणार आहेत. दापोली तालुक्यातील पालगड या गावाच्या पूर्वेला दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर हा किल्ला आढळला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३९० मीटर (१२८० फूट) उंचीवर रामगड हा एक अपरिचित असा छोटेखानी किल्ला सापडला आहे. दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि सचिन जोशी यांनी अथक प्रयत्नांनी हा अप्रसिद्ध रामगड किल्ला शोधून काढला आहे. रामगड किल्ला सापडल्यामुळे ऐतिहासिक ठेव्याचा एक नवा वारसा प्रकाशझोतात आला आहे.

रामगड किल्ला हा पालगडचा जोडकिल्ला

रामगड हा नव्याने सापडलेला किल्ला, पालगड किल्ल्याचा जोडकिल्ला आहे. त्यामुळे किल्ल्याची स्थाननिश्चिती झालेली नव्हती. महाराष्ट्रात रामगड नावाचे दोन किल्ले आहेत. यातील पहिला ‘रामगड’ किल्ला हा सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण तालुक्यात आहे. तर दुसरा ‘रामगड’ किल्ला रत्नागिरी जिह्यातील खेड तालुक्यात आहे. या किल्ल्याची बांधणी कोणत्या काळात झाली याची माहिती सध्या उपलब्ध नाही. दुर्ग अभ्यासकांकडून याबाबत अधिक शोध सुरु आहे. मात्र पालगड किल्ल्याबरोबरच हा रामगड किल्लादेखील बांधला गेला असावा, अशी माहिती दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि सचिन जोशी यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -