रत्नागिरी : गुवाहाटी आसाम येथे झालेल्या चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत भारताचे स्त्री व पुरुष गटाचे संघ अंतिम फेरीत विजयी झाले. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीची नोंद घेत मुलींच्या संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी रत्नागिरीची कन्या अपेक्षा सुतार हिचा रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी सत्कार केला. यावेळी निलेश राणे यांनी तिच्या कामगिरीचे कौतुकही केले.
यावेळी स्वाभिमान क्रीडा संघाचे अध्यक्ष सतेज नलावडे व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.