Tuesday, April 22, 2025
Homeमनोरंजनजाणून घ्या जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास...

जाणून घ्या जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास…

मुंबई: आज जागतिक रंगभूमी दिन. आजपासून बरोबर ६२ वर्षांपूर्वी हा दिवस साजरा करायला सुरूवात झाली. १९६१ मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला.

जगाच्या रंगमंचावरील पहिले नाटक अथेन्समधील एक्रोपोलिस येथे असलेल्या डायोनिससच्या थिएटरमध्ये झाले. हे नाटक पाचव्या शतकाच्या सुरुवातीचे मानले जाते. यानंतर थिएटर संपूर्ण ग्रीसमध्ये वेगाने पसरले.

इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटतर्फे दरवर्षी एक कॉन्फरन्स आयोजित केली जाते. ज्यामध्ये जगभरातून एक थिएटर आर्टिस्ट निवडला जातो, जो जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जगाला एक खास संदेश देतो. १९६२ साली ज्यो कॉक्चू यांनी हा संदेश दिला होता. २००२ मध्ये भारतातील प्रसिद्ध अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांना हा मान मिळाला होता. हा संदेश सुमारे ५० भाषांमध्ये अनुवादित केला जातो.

रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली. विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या मराठीतल्या पहिल्या संवाद आणि संगीत नाटकाचा १८४३ मध्ये सांगलीत प्रयोग झाला.

एकेकाळच्या बहारलेल्या मराठी नाट्यसृष्टीला आता उतरती कळा लागली आहे. मुबंई-पुणे वगळता व्यावसायिक नाट्य निर्मितीचे प्रयत्न रसिकांचा प्रतिसाद घटल्याने बंद पडले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -