‘महाराष्ट्र शाहीर’च्या टीझरचे प्रकाशन


  • ऐकलंत का!: दीपक परब


'जय जय महाराष्ट्र माझा...’ हे अजरामर महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ या बहुचर्चित चित्रपटाची पहिली झलक अर्थात टीझरचा प्रकाशन समारंभ शाहिरांच्या आठव्या स्मृतिदिनी नुकताच वांद्रे येथील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथे झाला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते या टीझरचे प्रकाशन करण्यात आले. शाहिरांची ही जीवनगाथा म्हणजे रसिकांसाठी गाण्यांच्या रूपातील एक पर्वणी असणार असल्याची खात्री हा टीझर पटवून देतो. यावेळी शाहिरांच्या पत्नी श्रीमती राधाबाई कृष्णराव साबळे, दिग्दर्शक केदार शिंदे, प्रमुख कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे, निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे, संगीतकार अजय-अतुल तसेच पटकथा-संवाद लेखिका प्रतिमा कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेला हा चित्रपट एक भव्य आणि केवळ पडद्यावर पाहावा असाच चित्रपट आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या लौकिकाला साजेसा असा हा मोठ्या बजेटचा चित्रपट आहे. शाहिरांबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘कोणताही स्वातंत्र्यलढा, कोणतीही सामाजिक चळवळ ही मनामनात, घराघरात पोहोचविण्याचे काम हे कलाकार करत असतात. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश १९६० साली आला, त्यात अनेक लोकांचे योगदान होते. पण त्या काळात शाहिरांनी दिलेले योगदान खूप मोठे होते. अशा लोकांमुळे स्वातंत्र्य लढा असो की संयुक्त महाराष्ट्र सारखी चळवळ असो, त्या जवळ येत जातात. हे लोक मनामनात आणि घरघरात पोहोचलेले असतात. कोणतीही चळवळ सांघिक स्वरूपात नेण्यात अशा लोकांचा फार मोठा वाटा असतो. हे जगभरातील अनुभव आहे. शाहिरांचे हे सर्वात मोठे योगदान आहे. शाहिरांनी मी लहानपणापासून पाहत आलो आहे. ते आमच्या घरी माननीय बाळासाहेबांना भेटायला यायचे. मला ते ‘जय जय महाराष्ट्र माझा...’वाले शाहीर म्हणून माहीत होते. पण शाहिरांबद्दल एक गोष्ट सांगतो, की जे ठरावीक लोक बाळासाहेबांना ‘बाळ’ म्हणायचे त्यात एक शाहीर होते. आज बायोपिक बरेच येतात. त्यासाठी तो माणूसही तसा असावा लागतो. पण शाहिरांच्या या जीवनपटात एकेक महत्त्वाच्या गोष्टी पुढे येत जातात.’

Comments
Add Comment

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं