Sunday, March 16, 2025
Homeसाप्ताहिककोलाजफंगल इन्फेक्शन/दाद/गजकर्ण

फंगल इन्फेक्शन/दाद/गजकर्ण

  • डॉक्टरांचा सल्ला: डॉ. रचिता धुरत

गजकर्ण (फंगल इन्फेक्शन) हे त्वचेचे एक इन्फेक्शन (संसर्ग) आहे. ते एका डर्माटोफाइट नावाच्या जीवाणूमुळे होतात. केस आणि नखं देखील प्रभावित करू शकतात. अलीकडच्या काळात याकडे एक प्रकाराची महामारी म्हणून पाहिले जात आहे. खरं तर चर्मरोग ओपीडीमध्ये ६० ते ७० टक्के रुग्ण हे गजकर्णचे असतात. पूर्वी हा आजार कुटुंबातील पुरुष सदस्यांमध्ये जास्त असल्याचे मानले जात होते; परंतु आता मुले आणि वृद्धांसह कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये हे समप्रमानात दिसून येतात.

कारण डर्माटोफाइट्स (ट्रायकोफायटोन/ एपिडर्मोफायटोन/मायक्रोस्पोरम) नामक फंगस हे गजकर्णचे मुख्य कारण आहे. ते त्वचेचे केराटिन नामक प्रथिने खातात जे केस आणि नखे यांच्या वरच्या आवरणावर असतात. हे फंगस उष्ण आणि दमट वातावरणात वाढतात.

संसर्ग

१. फंगल इन्फेक्शन असलेल्या व्यक्तीच्या त्वचेशी संपर्क होणे.
२. टॉवेल, कंगवा किंवा फोन यांसारख्या संक्रमित वस्तूंचा वापर – जे गजकर्ण असलेल्या व्यक्तीने वापरले आहेत.
३. संक्रमित कुत्रे, मांजर किंवा इतर प्राणी जे फंगल इन्फेक्शनने बाधित आहेत. यांसारखे पाळीव प्राणी हा संसर्ग मानवांना संक्रमित करू शकतात.
४. फंगल इन्फेक्शन संक्रमित मातीशी संपर्क आल्यामुळे पण हे पसरू शकतात. फंगल इन्फेक्शनसाठी खालील घटक जबाबदार आहेत :
१. जास्त घाम येणे/ घट्ट बसणाऱ्या कपड्यांचा नियमित वापर.
२. एकपेक्षा जास्त घटक असलेल्या (डेरोबिन मलम/झालीम लोशन) चुकीच्या व ओव्हर-द-काऊंटर मलामांची सहज उपलब्धता आणि अंधाधुंद वापर.
३. स्टिरॉइड्स (पँडर्म क्रीम/ डर्मी ५ क्रीम) असलेल्या क्रीम्सचे अनियंत्रित वितरण – स्टेरॉइडचा गैरवापर.
४. त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेण्यास विलंब.
५. उपचारांचे पालन व्यवस्थित न केल्यामुळे हाचा संसर्ग वाढतो.
६. घरगुती उपाय- कडुलिंबाचा पाला, कापूर इत्यादींचा वापर.
७. घरातील इतर सदस्यांना सारख्या प्रकारचे फंगल इन्फेक्शनची बाधा असणे.
८. जंतुनाशक साबण आणि लोशन (डेटॉल/सॅव्हलॉन लोशन) यांनी वारंवार संसर्गजन्य जागा धुतल्यामुळे त्वचेचे वरचे प्रोटेक्टिव आवरण नष्ट होते व त्यामुळे फंगल इन्फेक्शन प्रादुर्भाव होतो.
९. पाण्याशी जास्त वेळ संपर्कात आल्यामुळे, विशेषत: महिलांमध्ये नखांना गजकर्णाचे संसर्ग होण्याची शक्यता असते.
१०. फंगल इन्फेक्शन वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे अर्धवट उपचार ज्यामुळे फंगल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव वाढत जातो.

गजकर्ण कोणाला होऊ शकतो?

ते कोणालाही होऊ शकते, त्याला वयाची कोणतीही अट नाही. नवजात ते वृद्ध व्यक्तींवर याचा परिणाम होऊ शकतो.

गजकर्ण कसे ओळखले जातात?

१. हे मुख्यतः शरीराच्या कुठल्याही भागावर मुख्यतः फोल्डवर असलेल्या भागांवर पाहायला मिळतात. यात लाल रंगाचे, गोलाकार, सपाट चट्ट दिसून येतात. जर याचा योग्यवेली उपचार केला नाही तर ते शरीराच्या कोणत्याही भागावर पसरू शकतात. आजकाल असे निदर्शनास आले आहे की, स्टिरॉइड्स असलेल्या क्रीम्सचा अतिवापर केल्यामुळे गजकर्णाचे प्राथमिक स्वरूप लपत आहे आणि ते एक्जिमा (इसब) किंवा सोरायसिस (टायनिया इनकॉग्निटो) सारख्या इतर त्वचाविकारांची नक्कल करू शकतात.
२. खाज ही गजकर्णाचे मुख्य लक्षण आहे, जे १००% रुग्णांमध्ये पाहायला मिळते.
३. हाता-पायांचे गजकर्ण (एथलीटस फूट) – यामध्ये तळवे आणि पायाच्या बोटांमध्ये खाज सुटते. खवले निघतात, जळजळ होऊन पायाला दुर्गंध सुटतो.
४. नखांचे फंगल इन्फेक्शन – यात एक किंवा अनेक नखांवर परिणाम होऊ शकतो. यात नखे जाड होतात आणि त्यांचा रंग बदलतो. हा त्रास सहसा ज्यांचा संपर्क पाण्याशी होतो त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो.
५. दाढीचे फंगल इन्फेक्शन – याचा परिणाम पुरुषांच्या चेहऱ्यावरील केसांवर होऊ शकतो, ज्यामध्ये रुग्णाला लाल ते पिवळे पुरळ येऊन त्यात खाज सुटते.
६. टाळूचा बुरशीजन्य संसर्ग (Tinea capitis) – हे टाळूवर खाज सुटणे आणि त्वचा सोलणे यांच्याशी निगडित केस गळणे म्हणून प्रकट होते. मुलांमध्ये टाळूच्या फंगल संसर्गाचे हे एक सामान्य कारण आहे; परंतु अलीकडे ते प्रौढ लोकांमध्ये देखील आढळते.

उपचार

१. त्वचा – फंगल इन्फेक्शनचा उपचार करण्यासाठी अनेकदा अँटीफूगल क्रीम, लोशन व योग्य गोळ्या आवश्यक असतात. हे चार ते सहा आठवड्यांच्या कालावधीसाठी दिवसातून दोनदा तुमच्या त्वचारोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार घेणे गरजेचे असतात यापैकी बरेच अँटीफंगल औषध हे लहान मुले, गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये वापरण्यासाठी

सुरक्षित असतात.

२. पायाचे फंगल इन्फेक्शन – यामध्ये अँटीफंगल गोळ्या, औषधांसह अँटीफंगल क्रीम किंवा फवारण्या जास्त काळ वापरल्या जातात.
३. नखे – नखे जाड असल्याने आणि त्यांची वाढ खूप हळू होत असल्याने, अँटीफंगल औषध दीर्घ कालावधीसाठी (३ ते ६ महीने) दिले जाते. त्यामुळे तुमच्या त्वचारोगतज्ज्ञाकडे त्याचा पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे.

इतर उपचार

१. आंघोळीसाठी गरम पाण्याऐवजी साधारण पाणी/कोमट पाणी वापरा. ज्या व्यक्तींना जास्त घाम येतो त्यांनी दिवसातून दोनदा आंघोळ करावी व संपूर्ण शरीर व्यवस्थित कोरडे करावे. कसरत केल्यानंतर आंघोळ करा कारण फंगल इन्फेक्शन हे ओलसर, ऊबदार भागात वाढतात.
२. नियमित सैल सुती कपडे घाला.
३. जोपर्यंत एखाद्या पात्र त्वचारोग तज्ज्ञाने शिफारस केली असेल तोपर्यंत प्रभावित उपचार चालू ठेवावे. हे उपचार थांबवल्यानंतर फंगल इन्फेक्शनचे संसर्गाचे पुन्हा दिसणे कमी करण्यास मदत करते.
४. शरीरातील संक्रमित भाग नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवा. कारण आर्द्रता बुरशीजन्य संसर्गास अनुकूल करते.
५. वापरलेले टॉवेल गरम पाण्यात धुवा आणि उन्हात वाळवा.
६. सिंथेटिक मोजे आणि शूज टाळा ज्यामुळे तुम्हाला जास्त घाम येतो. आपले पाय दररोज साबणाने धुवा आणि धुतल्यानंतर पूर्णपणे कोरडे करा.
७. तुमचे कपडे आणि मोजे रोज बदला.
८. घाम येऊ नये म्हणून घट्ट कपडे घालणे टाळावेत.
९. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी कापड/टॉवेल/कंघी/टोपी आणि इतर वैयक्तिक वस्तू शेअर करणे टाळा.
१०. जर तुमच्या पाळीव प्राण्यांना बुरशीजन्य संसर्गाची लागण झाली असेल तर पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण कुत्रे, मांजरी आणि इतर पाळीव प्राणी हा संसर्ग मानवांमध्ये पसरवू शकतात.

तुम्हाला फंगल इन्फेक्शनची लागण झाली आहे, असे वाटत असल्यास नेहमी प्रशिक्षित त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. स्व-निदान आणि स्व-उपचारांना परावृत्त केले पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -