Saturday, July 6, 2024
Homeमनोरंजनपुन्हा गीतरामायण

पुन्हा गीतरामायण

  • नंदकुमार पाटील: कर्टन प्लीज

स्वरातीर्थ सुधीर फडके आणि महाकवी ग. दि. माडगूळकर यांची आजरामर कलाकृती म्हणजे ‘गीतरामायण’ १९५५ साली १ एप्रिलला श्रीराम नवमीचे निमित्त घेऊन पुण्याच्या आकाशवाणी केंद्रावरून हा सुस्वर कार्यक्रम सादर केला होता.

या गोष्टीला आता ६८ वर्षे झाली आहेत. दोन पिढ्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला आणि तिसरी पिढी संग्रही, ध्वनिमुद्रित, ऐकीव गोष्टीचे साक्षीदार होत आहेत. मागच्या पिढीला आज नव्याने हा कार्यक्रम सादर करावासा वाटतो आणि प्रेक्षक हा कार्यक्रम ऐकण्यासाठी गर्दी करीत असतात, हे या गीतरामायणाचे वैशिष्ट्य आहे. एक नव्हे, दोन नव्हे, तर छप्पन्न गाण्यांतून रामलीला माडगूळकर आणि फडके यांनी श्रोत्यांना ऐकवली होती. पुढे फडके यांनी तो रंगमंचावर सादर केला. त्यांचे चिरंजीव श्रीधर फडके यांनी त्यात सातत्य ठेवले. प्रेक्षक या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देतात. अनेक गायक, संगीतकार या गीतरामायणाचे सोबती झाले. नृत्यनाटकातूनही त्याची प्रचिती आली. सर्वात महत्त्वाचे सुवर्णमहोत्सवी वर्षाचे निमित्त घेऊन या गीतरामायणाचा भव्यदिव्य रंगमंच आविष्कार काही दिवसांसाठी विनोद तावडे यांनी आपल्या नेतृत्वात सादर केला होता. २९ व ३० मार्च या दिवशी शिवाजी मंदिर, प्रबोधनकार ठाकरे, गडकरी रंगायतन इथे ‘कॅम्लिन’ आणि ‘रंगाई’ या दोन संस्थेच्या वतीने ‘पुन्हा गीतरामायण’चे सुश्राव्य भाव आणि भक्तिगीते सादर केली जाणार आहेत. या तीन कार्यक्रमांच्या निमित्ताने गायक, वादक, निरूपण सादरकर्ते असे ११ कलाकार एकत्र येणार आहेत. गाण्यासाठी स्वप्नील बांदोडकर, अजित परब, शरयू दाते, मंदार आपटे, नचिकेत देसाई, केतकी भावे-जोशी यांना निमंत्रित केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -