Monday, July 15, 2024
Homeकोकणरायगडमाथेरानचे पर्यटन मंदीत, पण शासकीय कार्यालये तेजीत

माथेरानचे पर्यटन मंदीत, पण शासकीय कार्यालये तेजीत

खर्चाचा ताळमेळ घालताना व्यावसायिक घायकुतीला

माथेरान (वार्ताहर) : सध्या परीक्षेचा हंगाम सुरू असल्याने माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या रोडावली आहे; परंतु मार्च एंडिंगच्या नावाखाली येथील सरकारी कार्यालये वसुलीच्या नावाखाली तेजीत असल्याचे सर्वत्र पाहावयास मिळत आहे.

सध्या आर्थिक वर्षाचा शेवट जवळ आल्यामुळे माथेरानमधील वीज वितरण, पाणीपुरवठा कार्यालय, नगरपालिकेचे मालमत्ता कर अधिकारी व इतर शासकीय कार्यालयातील कर्मचारी सध्या मार्च एंडिंगच्या अगोदर वसुलीसाठी फिरताना पाहावयास मिळत आहेत. मागील दोन-तीन महिन्यांपासून माथेरानमध्ये प्रचंड मंदी पसरली असून येथील सर्व मोठे व्यावसायिक खर्चाचा ताळमेळ घालताना घायकुतीला आल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपासून परीक्षा हंगाम सुरू झाल्याने माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या घटलेली दिसते. त्यामुळे येथील व्यवसायिकांना प्रचंड मंदीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर येथील अनेक लहान दुकानदारांना त्याचा फटका बसला होता.

आता सुरू होणारा रमजान महिना, परीक्षा हंगाम व आईपीएल हंगाम यामुळे पुढील काही दिवस तरी माथेरानमधील पर्यटन मंदीत जाणार असल्याचे येथील व्यावसायिक बोलून दाखवत असून असे सुरू राहिल्यास येथील व्यवसायिकांना फार मोठ्या आर्थिक फटक्यास सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -