Sunday, June 22, 2025

महिला सन्मान योजनेला उत्तम प्रतिसाद; मुरबाडमधून ३९ हजार महिलांनी केला प्रवास

महिला सन्मान योजनेला उत्तम प्रतिसाद; मुरबाडमधून ३९ हजार महिलांनी केला प्रवास

मुरबाड : मुरबाड ग्रामीण भागातील तसेच आदिवासी पट्ट्यात व मुरबाड शहर परिसरात एसटीच्या महिला सन्मान योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.


राज्य सरकारच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात एसटी बस मध्ये महिलांसाठी पन्नास टक्के सवलत प्रवास योजना सुरू केल्याने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात मुरबाड बसमधून १७ ते २४ मार्चपर्यंत म्हणजे एका आठवड्यात जवळपास ३९,००० महिलांनी महिला सन्मान योजना अंतर्गत प्रवास केला आहे.


तसेच मुरबाड ग्रामीण भागात जवळपास मुरबाड बसेसचे ५० रूट आहेत, त्या रूटवर सध्या मुरबाड ग्रामीण भागातून बस धावत आहेत.


महिलांसाठी राज्य सरकारने ५० टक्के सन्मान योजना लागू केली आहे. त्याचा महिलांनी प्रवास करून जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच अजूनही मोठ्या प्रमाणात महिलांनी प्रवास करावा, असे आवाहन मुरबाड आगार प्रमुख योगेश मुसले यांनी केले आहे.

Comments
Add Comment