अनधिकृत मजार विरोधात माहीम, मुंब्र्यानंतर आता कल्याणमध्येही मनसे आक्रमक
कल्याण : कल्याण मधील लाल चौकी परिसरातील शिंदे मळा येथे अनाधिकृतपणाने रस्त्याच्या बाजूला मजार बांधण्यात आली आहे. आठ दिवसात ही मजार हटवली नाही तर मजारच्या बाजूला राम मंदिर बांधण्यात येईल असा इशारा मनसे शाखा अध्यक्ष महेश बनकर यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये समुद्रामध्ये असलेल्या अनधिकृत मजार हटवण्याबद्दल आव्हान केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनाधिकृत पणे उभ्या असलेल्या मजार हटवण्याची मोहीम मनसे कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे. कल्याण-पश्चिमेतील लालचौकी स्मशानभूमी समोरील अनधिकृत मजार अशोक शिंदे यांच्या मालकीच्या जागेत आहे. या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.