नवी दिल्ली: खासदारकी गमावल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पहिली प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी राहुल गांधींनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. राहुल गांधींचे निकटवर्तीय असलेल्या नेत्यांबरोबरच त्यांची बहिण प्रियंका गांधी यांनीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या आई आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही राहुल यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहचल्या आहेत
राहुल गांधींनी खासदारकी गमावल्यानंतर त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन अगदी मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राहुल गांधींनी, आपण भारतीयांचा आवाज बनून यापुढेही लढत राहू आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास आपण तयार आहोत असं म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या देशभरातील प्रमुख नेत्यांची ऑनलाइन माध्यमातून बैठक होणार असून पुढील वाटचाल कशी राहणार आहे यासंदर्भातील निर्णय या बैठकीमध्ये घेतला जाण्याची शक्यता आहे.
मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं।
मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 24, 2023