Monday, June 30, 2025

भाईंदर येथील उत्तन भागात बिबट्या जेरबंद

भाईंदर येथील उत्तन भागात बिबट्या जेरबंद

भाईंदर : भाईंदर येथील उत्तन परीसरातील पालखडी गावात गावकऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे.


गेल्या काही दिवसांपासून उत्तन परिसरात बिबट्या फिरत असल्याचे अनेकांनी पहिले होते. वन विभागाला तशी माहिती सुध्दा दिली होती. वन विभागाने काही ठिकाणी सापळे लावले होते. बिबट्याच्या दहशतीने गावकऱ्यांनी सुध्दा सापळा लावला होता. अखेर शुक्रवारी पहाटे पालखडी गावात गावकऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात बिबट्या जेरबंद झाला. यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment