'या' नाट्यगृहांवर मोफत सन्मानिका (पासेस) उपलब्ध
मुंबई: गेली सात दशके आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या पद्मविभूषण आशाताई भोसले यांना शुक्रवारी २४ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्यदिव्य सोहळ्यात राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अश्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते. सन २०२१ या वर्षीचा पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर झाला. तो पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान केला जाईल.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान सभा अध्यक्ष अँड. राहूल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून शिवाजी नाटयमंदिर, दामोदर हॉल, प्रबोधनकार ठाकरे नाटयगृह, दिनानाथ नाटयगृह, काशिनाथ घाणेकर नाटयगृह, वासुदेव बळवंत फडके नाटयगृह, आचार्य अत्रे नाटयगृह, गडकरी रंगायतन, विष्णूदास भावे नाटयगृह या नाटयगृहांवर कार्यक्रमाच्या मोफत सन्मानिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वावर उपलब्ध होतील.