Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेकामगारांची थकीत देणी द्या...

कामगारांची थकीत देणी द्या…

केडीएमसी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर एनआरसी कामगारांची धडक

कल्याण : मोहने, आंबीवली येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांनी आयटक संलग्न कामगार युनियच्या नेतृत्वाखाली आपली थकीत देणी मिळावी यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कल्याण यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी केडीएमसी आयुक्त आणि तहसीलदार यांनाही निवेदने देण्यात आली.

मोहोने येथील एन. आए. सी. कंपनी गेली १४ वर्ष बेकायदा लॉकआउटमुळे बंद आहे. ही कंपनी सर्व मालमत्तेसह अदानी समुहाने विकत घेतली आहे. अदानी समूहाला राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मुंबई येथून मिळालेल्या हुकुमनाम्याच्या विरोधात युनियनने दिल्लीच्या अपील प्राधिकरणात अपील दाखल केला आहे. हे प्रकरण प्रलंबित असताना तसेच महाराष्ट्र शासनाचा तसेच केडीएमसीचा कोट्यावधीचा कर बुडवला असताना, या कंपनीकडून हजारो स्केवर मीटरचे अनिधिकृत बांधकाम सुरू आहे.

त्यामुळे या कंपनीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा तसेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचा कोट्यावधीचा कर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आकारलेल्या दंडाची रक्कम भरल्यानंतरच त्यांना बांधकामाची परवानगी द्यावी. तसेच प्रॉविडंट फंडाची रक्कमही दंडासह त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अश्या अनेक मागण्याही या मोर्चाद्वारे करण्यात आल्याचे आयटकचे महाराष्ट्र उपाध्यक्ष उदय चौधरी यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -