Thursday, October 23, 2025
Happy Diwali

भाजपकडून या ४ राज्यांत नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती

भाजपकडून या ४ राज्यांत नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती

नवी दिल्ली: या वर्षभरातील विधानसभा निवडणूका आणि आगामी वर्षातील लोकसभा निवडणूका समोर ठेवुन भाजपने ४ राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. भाजपने दिल्ली, ओडिशा, राजस्थान आणि बिहारमध्ये नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली आहे.

बिहारमध्ये सम्राट चौधरी यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे. राजस्थानमध्ये चित्तौडगडचे खासदार सीपी जोशी यांना तर वीरेंद्र सचदेवा यांच्याकडे दिल्लीची कमान सोपवण्यात आली आहे. ओडिशातही नेतृत्व बदल करून माजी केंद्रीय मंत्री मनमोहन सामल यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे.

बिहारमध्ये भाजपला सम्राट चौधरी यांना प्रदेशाध्यक्ष केले आहे. येथे ओबीसी वर्गात आपली पकड मजबूत करण्यासाठी विशेषत: कुशवाह आणि कोरी समाजात नितीश कुमार यांचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपने घाव घालण्याची तयारी केली आहे.

Comments
Add Comment