Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमीधोक्याची घंटा! मुंबईची मुस्लिम लोकसंख्या ८ टक्क्यांवरुन २० टक्क्यांवर

धोक्याची घंटा! मुंबईची मुस्लिम लोकसंख्या ८ टक्क्यांवरुन २० टक्क्यांवर

आमदार नितेश राणे यांनी केले अलर्ट

मुंबई: माहिमच्या समुद्रातील अनधिकृत मजारचे बांधकाम तोडले कारण राज यांनी त्याकडे लक्ष वेधले मात्र फक्त महिमकडेच पाहू नका तर मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डात अशा घटना घडत आहेत. हा एक प्रकारचा लँड जिहादच आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे आज नितेश राणे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की लव जिहादनंतर लँड जिहाद सगळीकडे फोफावला असून फक्त माहीम मधील घटनेकडे पाहू नका तर चांदीवली येथे वनविभागाच्या जमिनीवर चार मजली मदरसा बांधण्यात आला आहे. तसेच चेंबूर स्टेशनला तर नाल्यावरच मशीद बांधली गेली आहे, त्याकडेही लक्ष द्या. प्रथम तेथे बकरे कापायचे. नंतर लाऊड स्पीकर वरून नमाज पढायचा. मग इतर धर्मीय जागा सोडून जातात. त्यानंतर त्यांच्या वस्त्या तयार होतात, अशी कार्यपद्धती सर्वत्र सुरू आहे. त्यामुळेच मुंबईची मुस्लिम लोकसंख्या आठ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

माहीमच्या मजारवर कारवाई केली त्याप्रमाणे यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाई करावी. तसेच इतर ठिकाणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -