आजच्या बैठकीत मोदींनी घेतला आरोग्य यंत्रणांचा आढावा
नवी दिल्ली : देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मोदींनी कोरोनाची सद्यस्थीती आणि याबाबत उपाययोजनांसाठी आरोग्य यंत्रणांची कितपत तयारी आहे याचा आढावा घेतला. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोविड-19 चे एकूण १ हजार १३४ नवीन रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी १९ मार्चला १ हजार ०७१ रुग्णसंख्या नोंदवली गेली होती, तर मंगळवारी ६९९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनामुळं पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ५ लाख ३० हजार ८१३ लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
आज साडे चार वाजता पंतप्रधान मोदी यांनी उच्च स्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान काय सुचना करतील, हे पाहावे लागणार आहे. देशातील सक्रिय कोरोना रूग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. देशात आता कोरोनाचे सक्रिय रुग्ण ७ हजार ०२६ वर पोहोचले आहेत.