हजारो भाषांनी समृद्ध असणारी भूमी, शेकडो जमातींचे तसेच जगातील सर्व मुख्य धर्म आणि धारणांचे निवासस्थान, बर्फाच्छादित पर्वतरांगांपासून उष्ण कटिबंधीय मैदानांपर्यंत आणि हिरव्यागार सदाबहार वनांपासून रखरखत्या वाळवंटापर्यंत निसर्गाच्या वैविध्यपूर्ण रूपांनी समृद्ध असा परिपूर्ण भारत हा केवळ एक देश नाही तर भरभरून जगणे, संस्कृती आणि श्रद्धा यांचा सुरेख मिलाप आहे. एखाद्या गालिचामध्ये क्लिष्ट पण तितकेच नाजूक विणकाम केलेले असते, तशीच आपल्या देशातील ही विविधता सर्वांना एकत्र बांधून ठेवते. जागतिक स्तरावरील एक प्रबळ शक्ती म्हणून भारत उदयाला येईल, तेव्हा हे वैविध्यच आपले सर्वात मोठे सामर्थ्य ठरेल.
पंतप्रधानांनी २०१५ साली ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मोहिमेची घोषणा केली, तेव्हा त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या अंतरातील एका अंतर्निहित भावनेला साद देत एकतेचा बंध दृढ केला आणि त्याचबरोबर विविधतेतील सामर्थ्यालाही अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘युवा संगम’ हा अलीकडचा उपक्रम आपल्या युवा वर्गाला हाताशी धरून विविधतेतील सामर्थ्याला योग्य दिशा देणारा आहे. या विविधतेतील सामर्थ्याच्या अनंत लाभांची जाणीव आपल्या देशाच्या भावी नागरिकांना करून देणे आणि प्रचिती घडवणे गरजेचे आहे. या उपक्रमांतर्गत आयोजित भेटींमुळे देशाच्या भावी पिढीला वैविध्यातील सामर्थ्याची जाणीव होईल, अशी अपेक्षा आहे. ईशान्येकडील राज्ये आणि उर्वरित भारतातील युवा वर्गाचा परस्परांशी असणारा बंध दृढ करणारा युवा संगम हा उपक्रम ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही भावना जोपासणारा आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या युवा संगम या देशव्यापी सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमाचे, ‘पर्यटन, परंपरा, प्रगती, प्रौद्योगिकी आणि परस्पर संपर्क’ असे पाच स्तंभ आहेत. या कार्यक्रमांतर्गत पुढच्या काही महिन्यांत २०००० पेक्षा जास्त विद्यार्थी भारतभर प्रवास करतील आणि विविध संस्कृती, वंश, पाककृती, भाषा, निसर्गचित्रे, स्थानिक इतिहास, तांत्रिक प्रगती, हस्तकला आणि कौशल्ये अनुभवतील. मी हे लिहीत असताना आयआयटी, आयआयएम, एनआयटी अशा आघाडीच्या संस्थांमधील १००० पेक्षा जास्त युवा आणि विद्यार्थी, भारताच्या विविध भागांत प्रवास करत आहेत आणि भारताची अस्सल परंपरा अनुभवत आहेत. या उपक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळी व्यावसायिक, सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेला हा वैविध्यपूर्ण समूह एकत्र येईल आणि आयुष्यभरासाठी जपता येतील असे अनुभव घेईल आणि हव्याहव्याशा स्मृतींचे गोफ विणेल. भारताच्या विविध भागांतून प्रवास करणाऱ्या आमच्या या युवा वर्गाला ईशान्येकडच्या राज्यांची जादू अनुभवता येईल; त्यांना निर्मितीची, सृजनाची आणि नवनवीन गोष्टी करून बघण्याची प्रेरणा मिळेल. त्याचबरोबर ईशान्येकडील आमच्या तरुणाईला सुद्धा भारताच्या विविध भागांना भेट देता येईल आणि ज्ञानाची, अनुभवाची देवाण-घेवाण करताना अविस्मरणीय अनुभवही घेता येतील. या उपक्रमांतर्गत युवा वर्ग स्थानिक उद्योगांना तसेच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देईल आणि त्याचबरोबर स्थानिक विद्यार्थी, उद्योजक आणि सरकारी अधिकारी यांच्याशीही संवाद साधेल. एखाद्या राज्याला भेट देण्याची संधी, इतकाच या दौऱ्याचा मर्यादित उद्देश नाही, तर हे दौरे म्हणजे त्या-त्या राज्याची वैशिष्ट्ये जाणून घेत त्यांची वाखाणणी करण्याची आणि भावनिकरीत्या त्यांच्याशी जोडले जाण्याची एक अनोखी संधी असेल. जेव्हा तुम्ही सिक्कीममधील युवा वर्गाला ओदिशामधल्या लहान मुलांसोबत सिक्कीमच्या लोकसंगीतावर ठेका धरताना बघाल, ईशान्येकडील विद्यार्थ्यांना ओदिशामधील एखाद्या गावात हातमागाची स्थानिक कला शिकताना पाहाल किंवा आंध्र प्रदेशातील खाद्यपदार्थांची परंपरा जाणून घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांना तिथल्या पाककला संस्थेला भेट द्याल, आयआयटी-गुवाहाटी आणि आयआयटी-गांधीनगरचे विद्यार्थी एकमेकांना गरबा आणि बिहू शिकवत असताना बघाल, तेव्हा खऱ्या अर्थाने भारताचे भविष्य सुरक्षित हातात आहे आणि आपण ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेच्या साध्याच्या दिशेने स्थिरपणे वाटचाल करत आहोत, असे आपल्याला ठामपणे म्हणता येईल.
‘माधवपूर खेड’ हा सुद्धा असाच आणखी एक उपक्रम आहे, जो भारताच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. गुजरातच्या माधवपूर गावात दरवर्षी ईशान्येकडची राजकन्या असलेल्या राणी रुक्मिणीसोबत भगवान श्रीकृष्णाचा विवाह साजरा करण्यासाठी एक अनोखा सोहळा आयोजित केला जातो. परस्परांपासून ३००० किमी पेक्षा जास्त अंतरावर असलेली दोन राज्ये या प्राचीन बंधनामुळे परस्परांशी जोडली गेली आहेत, आणि हा बंध त्यांनी तितक्याच असोशीने जपला आहे.
युवा संगम हा उपक्रम अतिशय अद्भूतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या समग्र दृष्टिकोनाचे दर्शन घडवणारा आहे. सहकारी विद्यार्थ्यांच्या घरी भेट देत आहेत तसेच त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी स्नेहबंध निर्माण करत आहेत. इतरांप्रति आदर, नवीन कल्पना स्वीकारण्याची आणि अंगिकारण्याची इच्छा, मतभेदांमधूनही मार्ग काढण्याची क्षमता, समान ध्येयासाठी एकत्रितपणे काम करण्याची भावना आणि विविध धारणांमधून शिकण्याची वृत्ती, अशा मूल्यांच्या आधारे भारताने शतकानुशतके प्रगती केली आहे. या अशा तत्वज्ञानाचे सार असणाऱ्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेचे भारताने शतकानुशतके आचरण केले आहे. हीच मूल्ये आपल्या तरुणाईमध्ये रुजवावीत तसेच देशाच्या भावी नागरिकांनी जाती आणि सांस्कृतिक भेदांच्या पलिकडे पाहावे, स्वतंत्र दृष्टीकोन बाळगावा आणि संपूर्ण भारत एक आहे, अशी जाणीव बाळगावी, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…