Monday, June 30, 2025

मुंबईचा आरसीबीवर रॉयल विजय

मुंबईचा आरसीबीवर रॉयल विजय



महिला प्रीमियर लीग



नवी मुंबई (वृत्तसंस्था) : अ‍ॅमेलिया केरच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मंगळवारी मुंबई इंडियन्सने रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघावर ४ विकेट राखून रॉयल विजय मिळवला. महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा हा सहावा विजय आहे.


आरसीबीने दिलेले १२६ धावांचे लक्ष्य गाठताना मुंबईने दमदार सुरुवात केली. हायली मॅथ्यूज (२४ धावा) आणि यश्तिका भाटीया (३० धावा) यांनी ५३ धावांची सलामी करत मुंबईला विजयाच्या वाटेवर नेऊन ठेवले. त्यानंतर हरमनप्रीत कौर, नॅट स्कीवर ब्रंट या झटपट बाद झाल्यामुळे आरसीबीने सामन्यात पुनरागमन केले. अ‍ॅमेलिया केरने नाबाद ३१ धावा तडकावत मुंबईचा विजय निश्चित केला. तिला पूजा वस्त्रकारने १९ धावांची साथ दिली. मुंबईने १६.३ षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात विजयी लक्ष्य गाठले.


तत्पूर्वी सामन्यात टॉस जिंकून मुंबई संघाने प्रथम गोलंदाजी करत आरसीबीला १२५ धावांवर रोखले. अगदी पहिल्या षटकापासून मुंबईने भेदक गोलंदाजी केली. अवघ्या एका धावेवर बंगळुरुची पहिली विकेट पडली. त्यानंतर स्मृती मन्धाना आणि एलिस पेरीने काहीस डाव सावरला. स्मृतीने २४ धावा, तर एलिसा पेरीने २९ धावा केल्या. रिचा घोषने खालच्या फळीत २९ धावा फटकावत बंगळुरुला कसेबसे १२५ धावांपर्यंत पोहचवले. अ‍ॅमेलिया केरने सर्वाधिक ३, तर इस्सी वोंग आणि नॅट ब्रंटने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर साईका इशाकने एक विकेट घेतली.

Comments
Add Comment