Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्राच्या विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या लग्नाची बोलणी

महाराष्ट्राच्या विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या लग्नाची बोलणी

हशा, कोपरखळ्या आणि चिमटे! विधानसभेत हास्याचा पाऊस

मुंबई: पाऊस पडावा म्हणून बेडकाचं लग्न लावून देतात पण आज सकाळी झालेल्या धो-धो पावसानंतर विधानसभेत लग्नाची चर्चा रंगली आहे. सकाळी भाकरी आणि चाकरी यावरुन झालेल्या खडाजंगी नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकच कोपरखळी मारली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत हास्याचा पाऊस पडला.

त्यातच देवेंद्र फडणवीसांनी आपल्या अनुभवाचे बोल सांगताच अनेकांना बाके बडवण्याचा मोह आवरला नाही. विधानसभेत रंगलेली नेत्यांची ही अनोखी हास्यजत्रा आजच्या दिवस भराच्या विधानसभेतील घडामोडींचे विशेष आकर्षण ठरली.

नेमके काय झाले?

आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत चर्चेदरम्यान कामगारांच्या लग्नावरून प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना, ”लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची आहे. तुटले तर त्याला सांभाळायची जबाबदारीही सरकारची आहे.” असे म्हणत, ”ही सूचना तपासून पाहू”, असे म्हटले. त्यानंतर फडणवीस यांनी, ”बच्चू कडू यांनी हा प्रश्न माजी मंत्री आदित्य ठाकरेंकडे पाहून तर हा विचारला नाही ना?” असा मिश्किल प्रश्न विचारुन, ”आदित्य ठाकरेंचे लग्न सरकारने लावायाचे असेल तर सरकार ही जवाबदारी घ्यायला तयार आहे”, अशी कोपरखळी मारली. फडणवीसांच्या या उद्गारांनंतर सर्वांनी सभागृहात बाक वाजविण्यास सुरुवात झाली.

यावर आदित्य ठाकरेंनीही मिश्किल टिप्पणी करत, ”ही नवीन राजकीय धमकी तर नाही ना?” असा चिमटा काढला. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही आदित्य ठाकरेंना चिमटा घेत, ”आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचे”, असे म्हटले. तर पुढे, देवेंद्र फडणवीस यांनी, ”कुणाचेही तोंड बंद करायचा लग्न हा उत्तम उपाय, हे मी अनुभवातून बोलतोय.” असे म्हणताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -