अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीगमध्ये खेळणार मुंबई इंडियन्सचा संघ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलमधील दिग्गज संघ मुंबई इंडियन्स आता अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीगमध्येही खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ न्यूयॉर्क संघाची धुरा सांभाळणार आहे.


अमेरिकेत होणाऱ्या मेजर क्रिकेट लीगमध्ये एकूण ६ फ्रँचायझींनी भाग घेतला आहे. त्यात भारतातील एकूण ४ फ्रँचायझींनी भाग घेतला आहे. या संघांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांचा समावेश आहे. या लीगमध्ये गुंतवणूक करणारी पहिली भारतीय फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स होती. केकेआरने लॉस एंजेलिस संघावर बाजी लावली होती.


मुंबई इंडियन्ससाठी ही जगातील पाचवी फ्रँचायझी असेल. यापूर्वी, मुंबई इंडियन्सने आयपीएल, एमआय केपटाऊन (एसए२०), एमआय एमिरेट्स (आयएलटी २०) आणि मुंबई इंडियन्स (डब्ल्यूपीएल) मध्येही आपले संघ उतरवले आहेत.


मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी म्हणाल्या की, वाढत्या एमआय कुटुंबात आमच्या न्यू यॉर्क फ्रँचायझीचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. अमेरिकेच्या या पहिल्या क्रिकेट लीगमध्ये प्रवेश केल्यानंतर मुंबई इंडियन्स हा जगातील एक मोठा जागतिक क्रिकेट ब्रँड बनेल. मुंबई इंडियन्ससाठी ही एक नवीन सुरुवात आहे आणि मी पुढच्या प्रवासाची वाट पाहत आहे.

Comments
Add Comment

IND VS ZIM : हरारेमध्ये ईशान किशनचे वादळ, झिम्बाब्वेसमोर २२० धावांचं लक्ष्य

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे सुरू आहे. या

Common Wealth Games 2026 : पुन्हा डोपिंग प्रकरण, दहा दिवसांत चौथी घटना; भारताला बसला मोठा फटका

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ साठी भारताने १२६ जणांच्या संघाची घोषणा केली. पण भारताच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र

Ind VS Zim : झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत दिला भारताला दुहेरी धक्का ! अभिषेक आणि वैभव पॉवर प्ले संपण्यापूर्वी बाद

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे खेळवला जात आहे. या

Abhishek vs Vaibhav In T20 : अभिषेक की वैभव टी-२० चा खरा बादशाह कोण? आकडेवारी काय सांगते, जाणून घेऊया

मुंबई : अभिषेक आणि वैभव या दोघांपैकी टी-२० मध्ये सर्वात स्फोटक फलंदाज कोण? याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात

Prime Minister Modi : पंतप्रधान मोदींकडून पॉवरलिफ्टर झंडू कुमारचे कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन

नवी दिल्ली : भारताने २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांच्या दुसऱ्या दिवसाचा शेवट एका पदकासह आणि अनेक दमदार कामगिरींसह

Anahat Singh : अनाहत सिंग जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत

ओंटारियो (कॅनडा): भारताची अव्वल मानांकित स्क्वॅश खेळाडू, अनाहत सिंगने जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपच्या