शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे विधानपरिषद अध्यक्षांना पत्र
बदलापूर : महाराष्ट्र राज्यात जुन्या पेन्शनसाठी जोरदार आंदोलने सुरु असतानाच दोन दिवसापूर्वीच शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधिमंडळामध्ये जुन्या पेन्शनसाठी आवाज उठवलेला आहे. ‘माझ्या शिक्षक बांधवांना पेन्शन मिळत नसेल तर मलाही पेन्शन नको’ असे पत्र शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज विधानपरिषद सभापती यांना दिले असून ते सोशल मिडीयावर फिरत आहे.
जुनी पेन्शन मिळावी म्हणून शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे गेल्या आठ वर्षापासून आंदोलन करत आहेत. जुनी पेन्शन मिळावी म्हणून एकही दिवस गप्प न बसता, ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे रोज पाठपुरावा करत आहेत. त्यांनी शिक्षकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. तसेच संघटनांची सभा तात्काळ लावावी व जुन्या पेन्शनचा तिढा सुटावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून जुनी पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी ते आग्रही आहेत.