बार्शी : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एक आक्षेपार्ह फोटो ट्वीट केल्याप्रकरणी बार्शीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. राऊत यांच्या ट्वीटनंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही राऊतांवर टीका केली होती.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटरवर एका अत्याचारपीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतला फोटो शेअर केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, “देवेंद्रजी, हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत? ५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत.”
यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया दिली होती. हा व्हिडीओ त्यांनी आपल्या अधिकृत खात्यावरुन ट्वीट केला होता. आपल्या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी संजय राऊतांनी हा फोटो व्हायरल केल्याबद्दल आक्षेप घेतला होता. तसेच महिला आयोगाला कारवाई करण्याची मागणीही केली होती.
चित्रा वाघ यांनी गृहविभाग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत संजय राऊतांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…