शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी यादीच दिली
मुंबई : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी एक यादी शेअर करत उद्धव ठाकरे गट आयारामांच्या भरवशावर असल्याचा आणि अजून कोण उरलेय का, असा खोचक टोला लगावला आहे.
शीतल म्हात्रे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ठाकरे गटातील आयारामांची यादी दिली आहे. कोण कोणत्या पक्षातून ठाकरे गटात आला याची माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली आहे. तसेच ही यादी देताना अजून कोण उरलेय?, अशी खोचक कमेंटही केली आहे.
शीतल म्हात्रे यांनी दिलेली यादी
- सचिन अहिर-राष्ट्रवादी
- सुषमा अंधारे–राष्ट्रवादी
- भास्कर जाधव–राष्ट्रवादी
- वैभव नाईक–काँग्रेस
- मनिषा कायंदे–भाजप
- प्रियंका चतुर्वेदी–काँग्रेस
- संजना घाडी–मनसे
- राहुल कानाल–काँग्रेस
- साईनाथ दुर्गे–मनसे