Monday, June 16, 2025

खूशखबर! आरेत नवीन पिकनिक पॉइंट

खूशखबर! आरेत नवीन पिकनिक पॉइंट

मुंबई : ज्येष्ठांपासून ते लहान मुलांच्या मनोरंजनासाठी आरेच्या नैसर्गिक वातावरणात नवीन स्वरुपात आरे पिकनिक पॉइंट तयार करण्यात येत असून मुंबई शहराच्या चारी बाजूने येणाऱ्या लोकांना सोयीस्कर होणार आहे.


मुंबई उपनगरातील गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत १५ एकर जमिनीवर प्रियंका सर्विसच्या माध्यमातून आरे पिकनिक पॉइंट निर्माण करण्यात आले आहे. यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष राजेश मिश्रा यानी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.


लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी काळजी घेत निरनिराळ्या ३७ प्रकारचे पक्षी व १५ प्रकारची बदके अनेक प्रजातीच्या पशू-पक्ष्यांचा समावेश आहे. हे सर्व पक्षी परदेशातून आणणार असून येथील हवामानाशी एकरूप होण्यासाठी सोय केली आहे.


येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळे गेम, एकत्र बसण्यासाठी बांबूंच्या खोल्या, खाण्यासाठी फूड प्लाजा, आंघोळीसाठी बाथरूम, शौचालय बनवण्यात आले आहे. पर्यटकांना ही एक मेजवाणी असून येत्या १५ एप्रिलपर्यंत या पिकनिक पॉइंटचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Comments
Add Comment