Wednesday, July 9, 2025

केंद्र सरकार सतर्क! आरोग्य मंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी

केंद्र सरकार सतर्क! आरोग्य मंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ नोंदवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. श्वास घेण्याचा त्रास, ताप किंवा खोकला ५ दिवसांपेक्षा अधिक काळ असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे केंद्र सरकारने सांगितले आहे.


पुन्हा एकदा मास्क वापरण्यास सुरूवात करावी. सुरक्षित अंतर ठेवावे, शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळीचे निरीक्षण करा, व्हायरल फ्लू आल्यास स्वत: कोणतीही औषधे घेऊ नका. कोरोनाशिवाय इतर कोणत्या विषाणूचा संसर्ग आहे का? याची खात्री करा. गंभीर लक्षण, उच्च ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या, अशा सूचना केंद्र सरकारमार्फत देण्यात आल्या आहेत. केंद्राने महाराष्ट्रासह, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकला पत्र लिहून अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment