Sunday, July 14, 2024
Homeदेशबुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकावल्या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. यानंतर आता अनिक्षाचे वडील कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून मुंबई सायबर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे ऑडिओ क्लिप्स आणि इतर डाटा नष्ट करण्यासाठी आरोपीने अमृता फडणवीस यांच्याकडे १ कोटींची खंडणीची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून याचप्रकरणी अनिल जयसिंघानीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अनिल जयसिंघानी याचे देशभरातील राजकीय नेते आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अनिल जयसिंघानीवर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि गोवा या सहा राज्यांमध्ये एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. मे २०१९ मध्ये त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. पोलीस अनिल जयसिंघानीचा शोध घेत होते. अखेर गुजरातमधून जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आरोपींनी मुंबईच्या एका जुन्या पोलीस आयुक्तांचे नाव घेतले. अनेक मोठ्या लोकांची नावे घेतली. तो व्यक्ती सापडल्यास हा कट उघड होईल. मला वाटते की, जुन्या सरकारकडून जे प्रयत्न सुरू होते. त्यात एक नवा प्रयत्न समोर आला आहे.

याप्रकरणी मोहित कंबोज यांनी देखील एक ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरेंचा फ्रंट मॅन बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. माजी सीपी संजय पांडे आणि अजून एक माजी सीपी तुमचे दिवस आता मोजा. लवकरच सर्व गोष्टींचा खुलासा होईल!

जो लोग दूसरे के लिए गड्ढा खोद्ते है,
वह खुद एक दिन उसी गड्ढे में गिर जाते हैं

अशा शायरीच्या ओळी ट्विट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -