Thursday, June 19, 2025

आशिष शेलार आणि धनंजय मुंडे यांच्यात खडाजंगी पण शेवटी मुंडेंनाच...

आशिष शेलार आणि धनंजय मुंडे यांच्यात खडाजंगी पण शेवटी मुंडेंनाच...

मुंबई: आज विधानसभा अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यात खडाजंगी झाली. मात्र, गिरिश महाजन यांनी मुंडे यांना शांत केले.


आज विधानसभा अधिवेशनात पुरवणी मागणीवर चर्चा सुरू असताना मंत्री उपस्थित नसल्याने धनंजय मुंडे आक्रमक झाले. विधानसभेत कृषी, महसूल आणि अन्य विभागांवर चर्चा होणार होती. पण, त्या विभागाचे मंत्री हजर नसल्याने धनंजय मुंडे संतापले. यावर आशिष शेलार यांनी, “विधानसभा अध्यक्षांनी जेव्हा कार्यक्रम घोषित केला होता, तेव्हा धनंजय मुंडे असते, तर ही आदळाआपट करावी लागली नसती. विधानसभा अध्यक्षांनी घोषित केलेल्या कार्यक्रमात मुंबईची चर्चा होणार होती. त्यानंतर पुरवणी मागण्यांवर चर्चा होती.” असा प्रतिवाद केला.


तसेच, मंत्री गिरीश महाजन यांनी, “राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या लागोपाठ पाच लक्ष्यवेधी होत्या. त्यांनी जेवण करून येतो म्हटलं. मात्र, आता ते आले आहेत, त्यामुळे सभागृह तहकूब करण्याची गरज नाही.” असं म्हणतं या वादावर पडदा टाकला.

Comments
Add Comment