Categories: कोलाज

ऑस्करचं राजकीय गणित

Share
  • मुक्तहस्त : अश्विनी पारकर

‘नाटू-नाटू’ या गाण्याने नेमकी अशी काय जादू केली? की तेलुगू सिनेमाने तेलुगू भाषेच्या सिनेमाच्या इतिहासातील पहिल्या ऑस्करवारीत थेट पुरस्कारच मायदेशी आणला.

कॉम्रेड आनंद पटवर्धन हे त्यांच्या सामाजिक-राजकीय, मानवाधिकार-केंद्रित चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांचं वाक्य आहे, ‘ऑल दॅट ब्रिद्स’ यासाठी ऑस्कर नाही पण ‘आरआरआर’ या सिनेमासाठी ऑस्कर मिळणं ही धर्मनिरपेक्ष भारताच्या तोंडावर चपराक आहे.

‘आरआरआर’ हा चित्रपट म्हणजे हिंदुत्वाचा केलेला निव्वळ जयजयकार आहे. यातील शेवटच्या सीनमध्ये जेव्हा रामचरण रामाच्या अवतारात समोर येतो तेव्हा थिएटरमध्येही कुत्सित खसखस पिकते. ब्रिटिशांविरुद्धच्या लढाईत हिंदू आणि दलित शक्ती एकत्र येत सत्तेचा नायनाट करतात, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सफल झाला. कारण, सिनेमाचा फर्स्ट हाफ हिट होता. त्या फर्स्ट हाफचा शेवटच्या सीनशी काहीही संबंध नव्हता. पण, तरीही आरआरआरमधील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ऑस्करसह ‘गोल्डन ग्लोब पुरस्कारा’वरही नाव कोरलं. पण, यातील मुख्य गोम अशी की, ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब हे तथाकथित प्रतिष्ठित पुरस्कार ही अमेरिकेचीच देणगी आहे.

ऑस्करची आताची ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म कॅटेगरी’ जी एकेकाळी ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिचर कॅटेगरी’ होती. ती खरंतर संशयास्पद विषय आहे. या कॅटेगरीचा इतिहास पाहिला, तर या कॅटेगरीत सर्वात जास्त पुरस्कार हे इटालियन सिनेमांना मिळाले आहेत. एकेकाळी अमेरिकेत स्थलांतरित होणाऱ्या परदेशी नागरिकांपैकी इटलीतील नागरिकांची संख्या सर्वात जास्त होती. २०व्या शतकापासून यात मॅक्सिकन्सची संख्या वाढली आणि २०१७ सालचा ऑस्कर ‘द शेप ऑफ वॉटर’ या मॅक्सिकन सिनेमाला मिळाला. आता अमेरिकेतील स्थलांतरित भारतीयांची संख्या झपाट्याने वाढतेय आणि त्यातही आंध्र प्रदेश राज्यातील तेलुगू भाषिक लोक सर्वात जास्त संख्येने अमेरिकेत स्थलांतरित होत आहेत. ‘आरआरआर’ हा सिनेमा मूळ कोणत्या भाषेतील आहे, हे पुन्हा एकदा वेगळे सांगायला नकोच!

या विषयाचा आढावा घेताना आता अमेरिकेतून पुन्हा भारतात येऊ. भारतात ऑस्कर पुरस्कारासाठी चित्रपटांची निवड करणारी समिती नेमकं कोणत्या निकषांच्या आधारे हे चित्रपट निवडते, हे स्पष्ट नाही. त्याची केवळ प्रदर्शनाची तारीख सोडल्यास निकषांच्या बाबतीत कोणतेही विशेष लक्षात घेण्याजोगे नियम या अधिकृत निवड समितीच्या म्हणजेच फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाहीत.

हा घोळ ‘लंचबॉक्स’च्या चित्रपटाच्या ऑस्कर एंट्री वादावेळी प्रामुख्याने निदर्शनास आला. समीक्षकांकडून गौरवला गेलेला, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विविध पुरस्कार पटकावणारा ‘लंच बॉक्स’ हा सिनेमा डावलून ग्यान कोरिया यांच्या ‘द गुड रोड’ या गुजराती सिनेमाला २०१३ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून एंट्री देण्यात आली. यावेळी ‘लंचबॉक्स’ चित्रपटाचा निर्माता अनुराग कश्यप याने फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या समितीचे अध्यक्ष त्यावेळी होते गौतम घोष. त्यांनी ‘लंचबॉक्स’ला बाजूला करून ‘द गुड रोड’ हा सिनेमा का निवडला याचं दिलेलं उत्तर हास्यास्पद होतं. ‘लंचबॉक्स’ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला सिनेमा आहे. ‘द गुड रोड’च्या वाट्याला हे यश आलेलं नाही. त्यामुळे या सिनेमाला भारताची अधिकृत एंट्री म्हणून ऑस्करसाठी पाठवण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुकास्पद ठरलेला सिनेमा ऑस्कर या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी न पाठवणे यापेक्षा लंचबॉक्स या सिनेमाची मोठी चेष्टा ती काय असू शकते. येथे ‘द गुड रोड’ या सिनेमाची समीक्षा करणं किंवा तो वाईट आहे असं म्हणणं हा उद्देश नसून जो दावेदार आहे त्याला हक्क न मिळाला म्हणून वाटणारी खंत आहे.

इटलीमध्ये ऑस्करसाठी सिनेमा निवडणारी निवड समिती आहे, असेच सिनेमे निवडते जे ऑस्कर पुरस्कार मायदेशी घेऊनच येतील. हॉलिवूडच्या मायानगरीत काय खपतं, हे या इटलीच्या निवड समितीला चोख माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या सिनेमांना सर्वात जास्त का ऑस्कर मिळतात, याचे दुसरे कारण तुम्हाला समजले असेलच.

थोडक्यात काय, तर ऑस्कर पुरस्कार आंतरराष्ट्रीय चित्रपट विभाग म्हणजे हॉलिवूडच्या नजरेतून इतर देशांमधील सिनेमाला ठरवणे. सिनेमा चांगला आहे की वाईट याचे निकष प्रत्येक प्रांतासाठी अगणित बाबींवरून ठरतात. शीतावरून भाताची परीक्षा घेणे ही म्हण प्रत्येक बाबतीत लागू होईलच असं नव्हे. काही म्हणींमध्ये कालानुरूप बदल करावे लागतात आणि ते गरजेचेच असतात. काही वेळा शीत शिजलेले असेल म्हणजे पूर्ण भात शिजलेला आहे असं म्हणणं चुकीचं आहे. त्याकाळी पातेल्यात भात शिजवत होते. आता प्रेशर कुकरमध्ये शिजवला जातो. त्यामुळे कुकरमध्ये डबा कलंडल्यास ज्या बाजूने डबा कलंडला आहे, तिकडचा थोडा भात जास्त शिजलेलाही अथवा पाणी असलेलाही असू शकतो. काही वेळा भाताचा पुलाव करताना तळाचा भात करपलेलाही असू शकतो. त्याच्यामुळे हॉलिवूडपट म्हणजेच श्रेष्ठ आणि आफ्रिका, लिबिया या मागास देशांमधील चित्रपट म्हणजे कनिष्ठ जे चित्रपट आपण पाहिलेच नाहीत ते नतद्रष्ट असं म्हणणं बंद करा. त्याऐवजी भारतीय चित्रपटांना हॉलिवूडच्या तराजूत तोलण्यापेक्षा ‘हे विश्वची माझे घर’ म्हणत चित्रपटांच्या आंतरराष्ट्रीय अवकाशात भारतीय चित्रपटांची भरारी पोहोचावी यासाठी काय करता येतंय ते बघा!

Recent Posts

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर २४ तासाच्या तपासाची माहिती! दहशतवाद्यांबद्दल ४ गोष्टी जाणून घ्या

नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…

8 minutes ago

Load shedding : उकाड्यामुळे वीजेची मागणी वाढली! भारनियमन होणार का?

मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…

16 minutes ago

चीनमध्ये ‘गोल्ड एटीएम’चा धुमाकूळ; आता एटीएमद्वारे सोने द्या, पैसे घ्या!

शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…

34 minutes ago

तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे हादरली जमीन

तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…

36 minutes ago

IPL 2025 on Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ MI विरुद्ध SRH सामन्यात मोठे बदल, मृतांना दिली जाणार श्रद्धांजली

चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू  हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…

38 minutes ago

Aatli Batmi Futli : ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटात मोहन आगाशे आणि सिद्धार्थ जाधवची दिसणार केमिस्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…

42 minutes ago