Thursday, July 18, 2024
Homeक्रीडाथेट डब्ल्यूटीसीच्या फायनल खेळणे म्हणजे फसवणूक होईल

थेट डब्ल्यूटीसीच्या फायनल खेळणे म्हणजे फसवणूक होईल

हार्दिक पंड्याचे वक्तव्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत संघातील सहभागाबाबत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने मोठे वक्तव्य केले. एकही कसोटी न खेळता मी थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणे हे माझ्या सहकारी खेळाडूंची फसवणूक होईल, असे पंड्या म्हणाला.

पंड्या म्हणाला की, संघातील खेळाडू वर्षभर कसोटी खेळत आहेत आणि संघात स्थान मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. अशा परिस्थितीत मी एकही कसोटी न खेळता थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणे हे माझ्या सहकारी खेळाडूंची फसवणूक केल्यासारखे होईल.

पंड्या पुढे म्हणाला की, मी डब्ल्यूटीसी फायनल आणि आगामी कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेपूर्वी पत्रकार परिषदेत पंड्याने ही माहिती दिली.

पंड्या पुढे म्हणाला की, श्रेयस अय्यरच्या पाठीची दुखापत संघासाठी चिंताजनक आहे. विश्वचषक स्पर्धा जवळ आलेली असताना श्रेयसच्या पाठीच्या दुखापतीमुळे संघाचे चौथे स्थान रिक्त झाले आहे. अय्यर तंदुरुस्त नसल्यास आम्हाला लवकरात लवकर त्याची जागा शोधावी लागेल. श्रेयस अय्यर हा मोठा फलंदाज आहे आणि त्याने लवकरात लवकर संघात परतावे अशी आमची इच्छा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -