Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीअयोध्येतील राम मंदिराचे फोटो व्हायरल! जाणून घ्या, केव्हा उद्घाटन?

अयोध्येतील राम मंदिराचे फोटो व्हायरल! जाणून घ्या, केव्हा उद्घाटन?

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे काही नवे फोटो व्हायरल झालेत. हे फोटो मंदिराचा गाभारा व तळमजल्याचे आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माहितीनुसार, मंदिर आता लवकरच पूर्ण होईल. जाणून घेऊया या मंदिराचे नेमके किती काम पूर्ण झाले आहे आणि उद्घाटन कधी होणार?

पहिल्या फोटोत मंदिराच्या गाभाऱ्याचे सर्वच स्तंभ उभे केल्याचे दिसून येत आहेत.

राम मंदिराच्या गाभाऱ्याच्या एका भागात दरवाजाची चौकट व भिंत आकार घेताना दिसते. तर ३ बाजूंनी भिंती उभ्या झाल्या आहेत.

प्रभु रामचंद्रांच्या दर्शनासाठी म्हणजे गर्भगृहापर्यंत पोहोचण्यासाठी ३२ पायऱ्या बांधण्यात येणार आहेत. यापैकी २४ पायऱ्या तयार झाल्या आहेत.

हे फोटो ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ट्वीटरवर शेअर केले आहेत.

२० फूट उंच भिंती मकराना येथील पांढऱ्या संगमरवराने बांधल्या जात आहेत.

रामसेवक पुरम व रामघाट येथे असलेल्या कार्यशाळेत तुळईचे कोरीव काम केले जात आहे.

याशिवाय सिंहद्वार, गाभाऱ्याच्या भिंती व खांबांच्या बांधकामाची भव्यताही छायाचित्रांतून दिसून येत आहे.

ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र यांनी सांगितले, ”मंदिराच्या बांधकाम पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण होत आहे. लवकरच गर्भगृहाचे बीम टाकण्याचे काम सुरू होईल”.

राम मंदिराच्या छताच्या जवळपास २०० बीम्सचे नक्षीकाम पूर्ण झाले आहे. कोरलेले दगड रामजन्मभूमी संकुलात नेले जात आहेत.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माहितीनुसार, मंदिराचे ७०% काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या डिसेंबरमध्ये काम पू्र्ण होऊन. २०२४च्या जानेवारी महिन्यात हे काम पूर्ण होईल.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -