मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेने १४० टी रेल्वे क्रेन वापरून कुर्ला स्थानकावर ८. ० मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिजच्या पाच प्लेट गर्डरचे काम करण्यासाठी अप जलद मार्गावर आणि डाऊन हार्बर मार्गावर आज मध्यरात्रीचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
आज रात्री ११.५० ते उद्या रविवारी पहाटे ४.२० दरम्यान अप जलद मार्गावर विक्रोळी ते माटुंगा आणि डाऊन हर्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन हर्बर मार्गावरील सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
डाऊन हार्बर मार्गावरील शेवटची लोकल ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री ११.१४ वाजता सुटणार आहे. अप हार्बर मार्गावरील शेवटची लोकल वडाळा रोडवरून रात्री ११.०८ वाजता सुटेल.
ट्रेन क्रमांक ११०२० कोणार्क एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२८१० हावडा-मुंबई मेल, ट्रेन क्रमांक १२१३४ मंगळुरू-मुंबई एक्सप्रेस व ट्रेन क्रमांक १२७०२ हैदराबाद-मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस मुलुंड आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि निर्धारित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचेल.