मुंबई: तुम्हाला तुमच्या ईपीएफ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) खात्यातील शिल्लक रक्कम तपासायची असेल किंवा तुम्हाला तुमच्या ईपीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर यासाठी तुम्हाला इन्स्टाग्रामची मदत होऊ शकते. ईपीएफओने याची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केली आहे.
तुम्ही ईपीएफओचे सदस्य आहात का? आणि तुम्हाला तुमचा भविष्य निर्वाह निधीबाबत कोणतीही माहिती हवी असेल तर ईपीएफओ सदस्य पोर्टल आणि उमंग अॅपचा उपयोग करु शकता. तसेच तुम्ही या दोन्ही सुविधांद्वारे डिजिटल लाइफ प्रमाणपत्रासाठी घरी बसून ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. की तुम्ही ईपीएफओ पोर्टल आणि उमंग अॅपला भेट देऊन माहिती मिळवू शकता.
Ensuring Ease of Living for Pensioners.
Follow us on Instagram: https://t.co/8aEMIcgGZP#AmritMahotsav #epfowithyou #epfo #pension @PMOIndia @byadavbjp @Rameswar_Teli @LabourMinistry @mygovindia @PIB_India @MIB_India @AmritMahotsav pic.twitter.com/wjuyhNEQmQ
— EPFO (@socialepfo) March 17, 2023
ईपीएफओने आपल्या वापरकर्त्यांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन नंबर) दिला आहे, त्यामुळे ईपीएफ फंड काढणे आता आणखी सोपे झाले आहे आणि ते ऑनलाइन केले जाऊ शकते, परंतु ईपीएफच्या रकमेवर ऑनलाइन दावा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांचा यूएएन सक्रिय करणे आवश्यक आहे.