Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीपाण्यावर 'तरंग आसन' करून गायला हरिपाठ

पाण्यावर ‘तरंग आसन’ करून गायला हरिपाठ

तळवाड्याचे हभप कृष्णा तात्यांची अनोखी साधना

  • बाळासाहेब अस्वले

दिंडोरी: भारतीय संस्कृती मध्ये अनेक भक्ती साधनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.अ त्यात ध्यानधारणा, समाधी, विविध स्वरूपांचे आसने ,विविध मंत्राचे पठण यामार्गाने प्रत्येक जण साधना करून भगवंताची भक्ती करीत असतो. परंतु याही पलीकडे पाण्यावर तरंग आसन संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ गाऊन भक्ती करतात ते तळवाडे(दिगर) गावाचे हभप कृष्णा महाराज रौंदळ. सध्या संत एकनाथ महाराज यांच्या पैठण येथे नाथ षष्ठी मोठ्या उत्साहात चालू आहे. येथील नाथसागरात पवित्र स्नान असंख्य भाविक भक्त करीत असतात.व देह पवित्र करीत असतात.
परंतु ज्यांनी आतापर्यंत चार पायी नर्मदा परिक्रमा करून व आपल्या समाजप्रबोधनातून जनजागृती करणारे हभप कृष्णा महाराज रौंदळ तळवाडेकर यांनी पैठणच्या नाथसागरात पाण्यांवर तरंग आसन लावून चक्क ज्ञानोबारायांचा हरिपाठ खोल पाण्यावर तरंगून गायला व उपस्थित भाविक भक्तांना हरिपाठात काय भक्ती महिमा आहे. हे सिध्द करून दाखविले. ह.भ.प कृष्णा महाराज यांनी या तरंग आसनावर नर्मदा मातेच्या तीरावर नर्मदे हर या भक्तीमय मंत्राचा उच्चार करून भाविक भक्तांची मने जिंकून घेतले आहे. सध्या वयाची साठ वर्षे पुर्ण केलेली असताना तबल चार लगातार नर्मदा परिक्रमा, आळंदी ,पंढरपूर,त्र्यंबकेश्वर, पैठण या क्षेत्रावरील असंख्य पायी वारी केल्या आहेत.
तरंग आसन संदर्भात बोलताना ते म्हणतात की मला पाण्यात पोहण्याची सवय लहानपणांपासून होती. परंतु ज्या दिवशी माझी परमार्थाची सुरुवात गुरूमाऊली कृष्णा माऊली खायदेकर यांनी केली तेव्हापासून मला या तरंग आसनावर हरिपाठ गाण्याची सवय लागली. यामागे माझे सद्गुरू कृष्णा माऊली खायदेकर यांचा मोठा आशिर्वाद आहे. असेही ते मोठ्या मनाने सांगतात.
चौकट
वेगवेगळ्या स्वरूपांची आसने आजही मोठ्या प्रमाणावर करतो. आसने, पायीवारी इत्यादी केल्याने आजही मी वयाची साठी पुर्ण करून मला कुठल्याही प्रकारचा आजार नाही. मी पुर्णपणे निरोगी जीवन जगत आहेत. तरुण वर्गाला ते नेहमी सांगतात की, व्यसनाधीन जीवन जगण्यापेक्षा विविध आसने, परमार्थाची कास धरा व आपले जीवन यशस्वी करा.
ह.भ.प कृष्णा महाराज रौंदळ(तळवाडेकर)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -