Wednesday, July 2, 2025

नागरिकांना लुटणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

नागरिकांना लुटणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

अवघ्या दोन ते अडीच तासात कोळशेवाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या


कल्याण : पोलीस असल्याचे सांगत दुचाकी घेऊन पसार झालेल्या तोतया पोलिसाला कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. दिलीप पाटील असे तोतया पोलिसाचे नाव असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. त्याने याआधी देखील अशाप्रकारे गुन्हे केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.


एका दुचाकी स्वाराला थांबवून आपण पोलीस असल्याचे सांगत दोन जणांनी त्याच्याकडून पैशांची मागणी केली. दुचाकीस्वाराने पैसे नसल्याचे सांगताच या भामट्यांनी त्याची दुचाकी ताब्यात घेत, आता दुचाकी पोलीस ठाण्यात येऊन सोडवा असे सांगत दुचाकी घेत तिथून पळ काढला. या दुचाकीस्वाराने त्वरित कोळशेवाडी पोलीस ठाण्यात येऊन शहानिशा केली असता हे तोतया पोलीस असल्याचे समोर आले.


याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तात्काळ त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर एकाला अवघ्या दोन ते अडीच तासात कल्याण-चिंचपाडा परिसरातून अटक करण्यात कोळशेवाडी पोलिसांना यश आले आहे.

Comments
Add Comment