Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीभाजप नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

भाजप नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

सांगली : सांगली जिल्ह्यातील जतमध्ये भाजप नगरसेवकाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विजय ताड असे या नगरसेवकाचे नाव आहे. ताड यांची इनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी गाडीवर हल्ला चढवत ताड यांच्यावर गोळ्या झाडल्या.

नगरसेवक विजय ताड हे आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोला रोडवरील शाळेतील आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. अल्फान्सो स्कूलजवळ पोहोचले असता ताड यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी ताडे यांची गाडी अडवली आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये ते जागीच गतप्राण झाले. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि कोणी केला हे मात्र समजू शकलेले नाही. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -