वाघ वाघ म्हणता आणि उंदीर खाता? आशिष शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : राज्य विशिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत आज मुंबईच्या प्रश्नावरील विशेष चर्चेत बोलताना आशिष शेलार यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. मुंबई मधील वेगवेगळ्या योजनेत झालेले घोटाळे, आणि विस्कळीत झालेल जनजीवन यावर आपली भूमिका मांडताना त्यांनी मुंबईत उंदीर मारण्याच्या योजनेत कसा घोटाळा झाला यावर प्रकाश टाकला. वाघ वाघ म्हणतात आणि उंदीर खाता? असा संतप्त सवाल करत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला.


मुंबई महापालिकाने गेल्या वर्षभरात ११ लाख २३ हजार उंदीर मारले. हे उंदीर मारण्यासाठी प्रत्येकी २३ रुपये खर्च आला आहे. आशिष शेलार म्हणाले या प्रकरणची चौकशी करण्यासाठी महापालिकेत गेलो. मारलेले उंदीर कुठे पुरले? किती लोक कामाला होते? काही माहिती नाही. अधिकारी म्हणाले, फाईल भिजली. त्यामुळे काही आकडेवारी नाही. अरे काय चाललंय? या शब्दांत आशिष शेलार यांनी आपला संताप व्यक्त केला.


दुसरीकडे राजावाडी हॉस्पिटल येथे शवगृहात एका व्यक्तीच्या पार्थिवाची हाताची बोटे उंदरांनी खाल्ली तर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर मध्ये एका पार्थिवाचे डोळेच उंदरांनी खाल्ले. अशा घटना घडल्या असताना जर हे म्हणत असतील की एवढे उंदीर मारले मग, हे उंदीर आले कुठून? असा प्रश्न देखील आशिष शेलार यांनी विचारला.

Comments
Add Comment

Meghna Sakore-Bordikar : ठाणे जिल्ह्याच्या पाणी नियोजनासाठी आता राज्य सरकारची उच्चस्तरीय संयुक्त बैठक

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे विधान परिषदेत आश्वासन मुंबई : ठाणे जिल्ह्यातील वाढत्या शहरीकरणामुळे

Sanjay Dina Patil : पत्रकारांचा अवमान योग्य नाही; चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करा" – संजय दिना पाटील यांना शिंदेंचा सल्ला

रोज अर्वाच्य भाषा आणि शिवीगाळ करणाऱ्यांवर शिंदे यांनी व्यक्त केला संताप मुंबई : पत्रकारांबाबत केलेल्या

Central Railway AC Local : मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी मोठी बातमी! एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार; थंडगार प्रवासाची संधी वाढणार

मुंबई : मुंबईतील लोकल प्रवास अधिक आरामदायी करण्याच्या दिशेने मध्य रेल्वेने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Chandrashekhar Bawankule : अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी 'टास्क फोर्स'

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा; मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांच्या

Anna Bansode : चिंचवडमध्ये ‘अजितसृष्टी’

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे; 'एमआयडीसी'चे प्लॉटिंग तात्काळ थांबवण्याचे निर्देश मुंबई : पिंपरी-चिंचवड

Special Educators : विधान परिषदेत विशेष शिक्षकांचा प्रश्न गाजला; मंत्र्यांचे विशेष बैठकीचे आश्वासन

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज राज्यातील 'अपंग समावेशित शिक्षण' योजनेतील विशेष