मुंबई : राज्य विशिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत आज मुंबईच्या प्रश्नावरील विशेष चर्चेत बोलताना आशिष शेलार यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. मुंबई मधील वेगवेगळ्या योजनेत झालेले घोटाळे, आणि विस्कळीत झालेल जनजीवन यावर आपली भूमिका मांडताना त्यांनी मुंबईत उंदीर मारण्याच्या योजनेत कसा घोटाळा झाला यावर प्रकाश टाकला. वाघ वाघ म्हणतात आणि उंदीर खाता? असा संतप्त सवाल करत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला.
मुंबई महापालिकाने गेल्या वर्षभरात ११ लाख २३ हजार उंदीर मारले. हे उंदीर मारण्यासाठी प्रत्येकी २३ रुपये खर्च आला आहे. आशिष शेलार म्हणाले या प्रकरणची चौकशी करण्यासाठी महापालिकेत गेलो. मारलेले उंदीर कुठे पुरले? किती लोक कामाला होते? काही माहिती नाही. अधिकारी म्हणाले, फाईल भिजली. त्यामुळे काही आकडेवारी नाही. अरे काय चाललंय? या शब्दांत आशिष शेलार यांनी आपला संताप व्यक्त केला.
दुसरीकडे राजावाडी हॉस्पिटल येथे शवगृहात एका व्यक्तीच्या पार्थिवाची हाताची बोटे उंदरांनी खाल्ली तर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर मध्ये एका पार्थिवाचे डोळेच उंदरांनी खाल्ले. अशा घटना घडल्या असताना जर हे म्हणत असतील की एवढे उंदीर मारले मग, हे उंदीर आले कुठून? असा प्रश्न देखील आशिष शेलार यांनी विचारला.