अरुणाचल प्रदेश (वृत्तसंस्था): अरुणाचल प्रदेशातील मंडला हिल्सजवळ गुरुवारी भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. या घटनेत दोन पायलट बेपत्ता झाले असून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरु असल्याचे, लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले.
आज सकाळी ९.१५ च्या सुमारास चित्ता हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. नेमका हा अपघात कसा झाला याची कोणतेही ठोस कारण अद्याप पर्यंत समोर आलेले नाही. दरम्यान, शोध पथके घटनास्थळी रवाना झाल्याची माहितीही, रावत यांनी दिली आहे.