Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेलेखी आश्वासनानंतर केडीएमटी चालक, वाहकांचे आंदोलन स्थगित

लेखी आश्वासनानंतर केडीएमटी चालक, वाहकांचे आंदोलन स्थगित

आता नादुरस्त बसेसपासून चालक, वाहक आणि सामान्यांची सुटका

कल्याण: आरटीओ आणि परिवहन व्यवस्थापकांच्या लेखी आश्वासनानंतर केडीएमटी चालक वाहकांचा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. केडीएमटीच्या नादुरुस्त बसेसबाबत कल्याण- डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियनने आज परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.

बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्या आणि आज परिवहन व्यवस्थापकांसोबत झालेल्या बैठकीत नादुरुस्त बसेस दुरुस्त झाल्यानंतरच रस्त्यावर उतरविण्यात येण्याचे आश्वासन मिळाल्याची माहिती युनियनचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे यांनी दिली. यावेळी संघटक बाबाजी शिंदे, सरचिटणीस अरविंद तांबे, सचिव किरण सपकाळे, कार्याध्यक्ष विष्णू आव्हाड, संघटक संजय पांडे, संदीप क्षोत्री, शांताराम परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या दल्नाथ कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाचे पदाधिकारी आणि कल्याण डोंबिवली महानगर परिवहन मजदूर युनियनचे पदाधिकारी यांच्या समवेत झालेल्या चर्चेत धोकादायक वाहनांचा वापर रस्त्यावर करू नये. परिवहनमध्ये असलेल्या बसेसची कागदपत्रासह यादी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे देण्यात यावी. तसचे गाड्यांची तक्रार ठेकेदारांकडे न करता अधिकाऱ्यांकडे करावी, या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आजचा मोर्चा जरी स्थगित झाला असला तरीही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास कामबंद करण्याचा इशारा कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियनने दिला आहे.

चालकाच्या तक्रारीचे निवारण झाल्यानंतरच बस रस्त्यावर धावणार

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत सद्यस्थितीत ९० बसेस रस्त्यावर धावत आहेत. युनियनच्या पत्राची दखल घेत परिवहन व्यवस्थापनाने, उपक्रमातील अभियंते निरिक्षक यांना प्रत्येक बस डेपोत आल्यानंतर संबंधित बसच्या चालकाची तक्रार आल्यास या तक्राराचे निराकरण केल्यानंतरच हि बस रस्त्यावर काढण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच आरटीओ मार्फत देखील या बसेसची तपासणी होणार असल्याचे परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -