Tuesday, April 29, 2025

देशताज्या घडामोडीमहत्वाची बातमी

देशभरात कोरोनाचे मागील चोवीस तासात ७५४ रुग्ण

देशभरात कोरोनाचे मागील चोवीस तासात ७५४ रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): देशभरात इन्फ्लुएंजा (Influenza H2N3) च्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना आता कोरोना व्हायरसनेही डोके वर काढल्याचे दिसत आहे. देशात जवळपास चार महिन्यानंतर एका दिवसात कोरोनाच्या ७५४ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता सक्रीय रुग्णांची संख्या ४ हजार ६२३ वर पोहोचली आहे.

मुंबईत सोमवारी १८ रुग्ण आढळले होते. तर मंगळवारी ही संख्या दुप्पट म्हणजेच ३६ रुग्ण इतकी झाली होती. यामध्ये दोन रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून अन्य रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे न दिसल्याने त्यांना घरात विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे अजूनपर्यंत मृत्यूची नोंद झालेली नाही.

तज्ज्ञांनी सांगितले की, सध्या अनेक लोक प्रवास करत आहेत. यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर मुंबईतील लोक एडिनोव्हायरस आणि एच3एन2 सारख्या व्हायरल इंफेक्शनमुळे आजारी पडत आहेत. ठाण्यातही बुधवारी कोरोनाचे २४ रुग्ण आढळले होते. आता ठाण्यात कोरोना रुग्णसंख्या ९८ इतकी आहे.

Comments
Add Comment