Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणकणकवली, देवगड व वैभववाडी रस्ते विकासासाठी ६१ कोटी मंजूर

कणकवली, देवगड व वैभववाडी रस्ते विकासासाठी ६१ कोटी मंजूर

आ. नितेश राणे यांनी आणला भरघोस निधी

  • संतोष राऊळ

कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ मध्ये, जिल्हा वार्षिक योजना नाबार्ड अर्थसहाय्य, स्टेट फंड आणि आशियाई विकास बँक या योजनेमधून कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघात ६१ कोटी २१ लाख रुपयांची २२ कामांना ग्रामविकास मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. सदरहू कामे मंजूर होण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता, तर भाजप आमदार नितेश राणे यांनी उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचेकडे सततचा पाठपुरावा केला होता. त्यामुळे ही कामे मंजूर झाली आहेत.

टेंबवली बस स्टॉप ते गावठाण मोंडतर रस्ता ४ कोटी ७८ लाख ६४ हजार रु., दहिबाव-मिठबाव तांबळडेग रस्ता इजिमा २५-७.१३० किमी साठी ७ कोटी १२ लाख ७४ हजार रु., १९ ते सांडवे कुवळे वीरवाडी रस्ता ग्रा.मा. २८५-४ किमीसाठी ३ कोटी १२ लाख ७४ हजार रु., रा.मा. १७८ ते तोरसाळे आरे रस्ता इजिमा २०-२.३६० किमी साठी २ कोटी ९ लाख ९ हजार , ४ ते दाभोळे १७ जोडरस्ता ग्रा.मा. १९१-१.४०० किमीसाठी १ कोटी १२ लाख ९४ हजार, रा.मा.४ ते खुडी रस्ता इजिमा ३३-४.०४०किमी साठी ३ कोटी २४ लाख ५४ हजार, वाघोटण बंदर ते वाघोटण तिठा रस्ता इजिमा १६-२ किमीसाठी १ कोटी ७६ लाख रुपये,११ ते पडेल रस्ता प्रा. मा. २९-१.८०० किमीसाठी १ कोटी ५३ लाख ८९ हजार, इजिमा ३ शेर्पे ते बेर्ले शेर्पे तांबळवाडी नापणे धबधबा रस्ता-३.९४० किमीसाठी २ कोटी ९७ लाख ३६ हजार, फोंडा पटेलवाडी घाडगेवाडी गांगोवाडी रस्ता १३-२.७०० किमीसाठी ३ कोटी ७८ हजार, १५ ते तरंदळे कुंदेवाडी ते सावडाव ब्राम्हणदेव खलांतरवाडी प्रजिमा २०ला मिळणारा रस्ता-३.३०० किमीसाठी ३ कोटी २१ हजार ८६ हजार, सांगुळवाडी निमअरुळे अरुळे सडुरे रस्ता इजिमा १०-४.१०० किमीसाठी ३कोटी २४ लाख १० हजार, सांगुळवाडी फाटकवाडी रस्ता ग्रा.मा. ११०-३ किमीसाठी २ कोटी १३ लाख २० हजार आदी कामे मंजूर झाली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -